व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून आपले सुद्धा होश उडतील…अनेक अभिनेते सुद्धा करतात या कॅप्सूलचा उपयोग

केस, चेहरा आणि त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी व्हिटॅमिन ई सर्वोत्तम आहे. आपण याचा वापर करुन चेहरा आणि केस चांगले ठेवू शकता. हे वापरण्यासाठी पाच मार्ग आहेत.
अँटीऑक्सिडंट्स भरलेले तेलाचे हे कॅप्सूल जवळच्या वैद्यकीय स्टोअरमध्ये मिळू शकते. व्हिटॅमिन ई देखील सौंदर्य व्हिटॅमिन म्हणून ओळखले जाते. आपण ते कसे वापरावे याची माहिती देत आहोत. आपण आपल्या त्वचेचा सौंदर्य वाढवू शकता, तसेच केसांना चमकदारपणा आणू शकता. या जीवनसत्त्वाच्या माध्यमातून आपल्या त्वचेची चमक वाढवू शकता.
व्हिटॅमिन-ई मध्ये अँटिऑक्सिडेंटची गुणधर्म आहे. आपल्या चेहऱ्यासाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहेत. परंतु, सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की, आपण ते योग्य वापरता किंवा नाही. कारण, जर ते व्यवस्थित वापरले असेल तर त्याचे परिणाम एका आठवड्याच्या आत आपल्याला दिसण्यास सुरुवात होईल.
त्वचेवर होणारे व्हिटॅमिन ई चे फायदे:-
त्वचेवर होणारे व्हिटॅमिन ई चे फायदे माहीत असल्यामुळे आजकाल अनेक सौंदर्योपचारांमध्ये याचा वापर हमखास केला जातो. यासाठीच जाणून घ्या व्हिटॅमिन ई त्वचेसाठी कसे फायदेशीर आहे.
त्वचा मऊ आणि मुलायम होते:-हवामानातील बदलांमुळे आजकाल त्वचेत कोरडेपणा निर्माण होतो ज्यामुळे त्वचा कोरडी होते. व्हिटॅमिन ईमध्ये नैसर्गिक तैलघटक असल्यामुळे याचा वापरामुळे मात्र तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. व्हिटॅमिन ईच्या परिणामामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते आणि चिरतरूण दिसते.
कसा कराल वापर:-व्हिटॅमिन ई ऑईल तुम्हाला कॅप्सुल अथवा तेलाच्या माध्यमात बाजारात मिळु शकते. दोन थेंब व्हिटॅमिन ई एक चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये मिक्स करा आणि चेहरा आणि इतर भागाच्या त्वचेवर त्याचा मसाज करा. आठवड्यातून दोनदा रात्री झोपताना नेहमी तुम्ही या तेलाचा मसाज तुमच्या त्वचेवर करू शकता.
चेवरील एजिंगच्या खुणा कमी होतात:-आजकाल कामाचा ताण आणि प्रदूषण यामुळे वयाच्या आधीच चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसू लागतात. सुरकुत्या, डार्क सर्कल्स, निस्तेज त्वचा, सैलसर त्वचा या एजिंगच्या खुणा चेहऱ्यावर दिसल्यामुळे तुमचे सौंदर्य झाकाळले जाते.
यासाठीच वेळीच व्हिटॅमिन ईचा वापर त्वचेवर करण्यास सुरू करा. ज्यामुळे त्वचेवरील या एजिंगच्या खुणा नक्कीच कमी होतील. व्हिटॅमिन ई चे फायदे जाणून घेताना त्याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला माहीत असायलाच हवं.
सनबर्नचे व्रण कमी होतात:-प्रखर सुर्यप्रकाशाच्या सानिध्यात असताना सनस्क्रीनचा वापर न केल्यास त्वचेवर सनबर्नच्या खुणा दिसू लागतात. एकदा सर्नबर्नचे व्रण अंगावर दिसू लागले की ते कमी होण्यास फार दिवस लागतात. हे डाग कमी करण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन ईचा वापर करू शकता.
कसा वापर कराल –यासाठी एक व्हिटॅमिन ईची कॅप्सुल घ्या आणि ती तोडून त्यातील तेलाने तुमच्या सनबर्न झालेल्या भागावर हलक्या हाताने मसाज करा. नियमित व्हिटॅमिन ईच्या तेलाच्या मसाजमुळे तुमच्या सनबर्नच्या खुणा विरळ होतील. मात्र लक्षात ठेवा व्हिटॅमिन ई ऑईल थेट त्वचेवर लावू नका.
तुमच्या वापरातील एखाद्या नैसर्गिक तेलात ते मिसळून मगच त्वचेवर लावा.चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात :-बऱ्याचदा चेहऱ्यावर फ्री रेडिकल्समुळे हायपर पिंगमेंटेशनचा परिणाम दिसून येतो. ज्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग अथवा वांगच्या खुणा निर्माण होतात. यावर तुम्ही व्हिटॅमिन ईच्या वापराने उपचार करू शकता. हे व्हिटॅमिन ई चे फायदे जाणून घेतल्यावर तुम्हाला चेहऱ्यावरील वांग पासून नक्कीच सुटका मिळेल.
त्वचा मुळापासून स्वच्छ होते:-त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वात आधी त्वचा नियमित स्वच्छ करणं फार गरजेचं आहे. मात्र चेहरा फक्त धुण्यामुळे तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ होईलच असं नाही.
कारण त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये धुळ, माती, प्रदूषण अडकून राहते. ज्यामुळे त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. मात्र व्हिटॅमिन ईचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ करू शकता. मेकअप काढण्यासाठी हा उपाय अगदी बेस्ट आहे.