वजन कमी होण्यासह, बद्धकोष्ठता, मासिक पाळी, अशक्तपणा अशा अनेक समस्यांमध्ये मिळतील हे मोठे लाभ… जाणून घ्या अळीवाच्या बियांचे फायदे

वजन कमी होण्यासह, बद्धकोष्ठता, मासिक पाळी, अशक्तपणा अशा अनेक समस्यांमध्ये मिळतील हे मोठे लाभ… जाणून घ्या अळीवाच्या बियांचे फायदे

अळीवच्या बिया आरोग्यासाठी खूपच चांगल्या असतात. अळीवच्या बियांना काही लोक हलीम असंही म्हणतात. बऱ्याचदा बाळंपणात अथवा थंडीच्या दिवसांमध्ये अळीवचे लाडू केले जातात. अळीव पेज आणि मिठाईच्या पदार्थांमध्येही वापरले जातात. अळीवाने फक्त तुमचे वजन कमीच होते असं नाही तर नियमित अळीव आहारात असेल तर तुमचे वजन पुन्हा वाढतही नाही.

अनेक आरोग्य तज्ञ्जही वजन कमी करण्यासाठी आहारात अळीव समाविष्ठ करण्याचा सल्ला देतात. हलीममुळे तुमचे शरीर डिटॉक्स होते. ज्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. शिवाय अळीवमध्ये भरपूर पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमचे वजन लवकर आणि योग्य पद्धतीने कमी होते आणि सोबत शरीराचे पोषणही होते.

मासिक पाळीशी संबंधित समस्या:-

आरोग्य निरोगी राहण्यासाठी आणि गर्भधारणेसाठी प्रत्येक महिन्यामध्ये पाळी येणे अतिशय महत्त्वाचे असते. अळीवाच्या बियांमध्ये फायटोकेमिकल हे घटक आहेत. नियमित अळीवाच्या बियांचे सेवन केल्यास शरीरातील हार्मोन नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. अनियमित मासिक पाळीच्या समस्या देखील हळूहळू दूर होण्यास मदत मिळू शकते.

​दूध वाढीसाठी:-

अळीवाच्या बिया लालसर रंगाच्या आणि अंडाकृती आकाराच्या असतात. डायरिया, कफ, अस्थमा या आजारांव अळीव फायदेशीर ठरतं. कारण ते शक्तीवर्धक आणि पोषक असते. बाळंतपणानंतर अळी व खाण्यामुळे स्तनपान देणाऱ्या महिलांच्या दुधात वाढ होते. अळीवामुळे मधुमेह, कोलेस्टेरॉल, बद्धकोष्ठता या सारख्या आरोग्य समस्या नियंत्रित राहतात.

अळीवामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. त्यामुळे अॅनिमिया अथवा अशक्तपणा असलेल्या लोकांना अळीवाचा चांगला फायदा होऊ शकतो. अळीव या तेलबिया असल्यामुळे त्यांच्या  सेवनाने अनेक त्वचारोगही बरे होऊ शकतात. मात्र ते उष्ण असल्यामुळे गर्भवती महिलांनी अळीवाचे सेवन करू नये कारण अळीवामुळे गर्भपात होण्याचा धोका असतो.

​अ‍ॅनिमियाची समस्या दूर करण्यासाठी:-

लोहाचा उत्तम स्त्रोत म्हणजे अळीवाच्या बिया. शरीराला योग्य प्रमाणात लोहाचा पुरवठा झाल्यास लाल रक्त पेशी वाढण्यास मदत मिळते आणि हिमोग्लोबिनची पातळी देखील सुधारते. याव्यतिरिक्त अळीवाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी देखील जास्त प्रमाणात असते. एक चमचा अळीवाच्या बियांचे सेवन केल्यास शरीराला १२ मिलीग्रॅम लोहाचा पुरवठा होतो. या बियांच्या सेवनामुळे शरीरातील रक्ताची कमतरता देखील दूर होते.

​रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी:-

अळीवाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, अँटी-ऑक्सिडंट आणि फॉलिक अ‍ॅसिड देखील असते. या पोषक घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होण्यास मदत मिळते. यातील अँटी-मायक्रोबियल गुणधर्मामुळे सर्दी-खोकला, ताप आणि घशातील वेदना कमी होण्यास मदत मिळते.

“वजन-कमी-करण्यासाठी-अळीवाचा-वापर-“>वजन कमी करण्यासाठी:-

अळीवाचा वापर बऱ्याचदा दूध, खीर, पेज, लाडू, मिठाई यात केला जातो. मात्र वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही गोडावर नियंत्रण ठेवणार असाल तर तुम्ही अळीव यापेक्षा जरा निराळ्या पद्धतीने नक्कीच खाऊ शकता. आधीच सांगितल्या प्रमाणे नारळाचे पाणी अथवा सॅलेडमधून तुम्ही अळीव आहारात घेऊ शकता.

सॅलेड आणि अळीव हे एक अप्रतिम कॉम्बिनेशन ठरेल. कारण यामुळे तुमच्या पोटात पुरेसे फायबर्स जातील. ज्यामुळे तुम्ही खाल्लेले अन्न पचण्यास मदत होईल अर्थात जास्तवेळ ते तुमच्या पोटात राहील्यामुळे तुमची भुक शांत राहील आणि तुम्ही अयोग्य आहार घेणार नाही.

ज्यामुळे याचा फायदा तुम्हाला वेटलॉस करण्यासाठी नक्कीच होऊ शकतो. तुमचे वजन कमी करण्याचे लक्ष साध्य करण्यासाठी तुमच्या हेल्दी ड्रिंक्स, ज्युस, स्मूदी आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये या सुपरसिड्सचा जरूर समावेश करा. अळीवामध्ये फॅट्सचे प्रमाण जवळजवळ नगण्य आहे.

बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी:-

अळीवाच्या बियांमध्ये असणाऱ्या फायबरमुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. उदाहरणार्थ पचनप्रक्रिया सुधारते, पोटाला किंवा पोटाच्या आतील अवयवांना आलेली सूज कमी होते, गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. वजन कमी करण्यासह अन्य आजारांपासून आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अळीवाचे सेवन करावे.

Health Info Team