स्वामी नावातच ताकद आहे सगळ्या संकटांना भिडण्याची,स्वामींच्यामुळे किंमत आहे जगण्याची

स्वामी नावातच ताकद आहे सगळ्या संकटांना भिडण्याची,स्वामींच्यामुळे किंमत आहे जगण्याची

स्वामी नावातच ताकत आहे,स्वामी हे नाव ज्यांनी घेतले त्यांच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही.ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतलाय त्यांनाच माहीत आहे,स्वामी कसे तारतात.संकटकाळी नुसतं नाव घेतलं तरी संकटांचा नाश होतो. स्वामींच्या नावाने जगण्याला धीर येतो.

आपण स्वामींच्या कडे जातो स्वामींची प्रार्थना करतो,स्वामींची भक्ती करतो.त्यावेळी स्वामी म्हणतात कोणतीही गोष्ट करताना मनापासून कर,त्यामध्ये सातत्य ठेव, कितीही अडचणी आल्या तरी ती गोष्ट सोडू नको.कारण ज्यावेळी अडचणी यायला लागतात त्यावेळी समज की तू योग्य रस्त्यावर आहेस. कारण वाईट रस्त्यामध्ये कधीच अडचणी येत नाहीत,चांगल्या रस्त्यावरच नेहमी अडचणी येतात कारण तिथे लोकांची संख्या जास्त असते.

अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षा देतात.नोकरीसाठी प्रयत्न करतात, चार-पाच वर्षे झाले ते प्रयत्न करत असतात मात्र त्यामध्ये यश मिळत नाही ते मग खचून जातात व नैराश्याकडे वळतात.एवढं करूनही आपल्या नशिबात ध्येय साध्य होत नसेल तर ती गोष्ट आपल्या नशिबातच नाही म्हणून आपण सोडून देतो.यावर स्वामी म्हणतात शिखरावर पोहोचताना दोन पायऱ्या अलीकडे असताना शिखरावरून खाली आला याचा अर्थ असा नाही की,तू हरलास; केवळ दोन पायऱ्या चढणे बाकी आहे त्यामुळे पुन्हा नव्याने मार्ग प्रमाण कर,यश तुझी वाट बघत आहे.

कोणी लग्नाच्या समस्येने त्रस्त आहे तर कोणी आजाराच्या समस्येने.या जगात असा कोणी व्यक्ती नसेल जो पूर्ण सुखी आहे.अनेकजण सर्व सोडून संन्यास घेत आहेत.कारण आपण ज्या लोकांसाठी जगतो तीच लोकं ज्यावेळी आपल्या विरोधात उभे राहतात त्यावेळी खूप दुःख होतं. कारण आपल्याच लोकांनी दिलेले घाव वर्मी बसतात.

एकदा एक लाकूडतोड्या झाड तोडत होता.त्यावेळी सर्व झाडे शांतपणे सहन करत होती.ती एकमेकांना म्हणत होती,हा कुऱ्हाडीचा दांडा आपल्याच जातीचा आहे नायतर आपल्याला तोडायची कोणाची हिम्मत न्हवती.म्हणून स्वामी म्हणतात आपल्याला अडचणीत आणणारी लोक लांबची नसतात कारण आपलं दुःख जवळच्या लोकांनाच माहीत असते.त्यामुळे ते जाणत असतात की आपल्याला कसे दुःख दयावे.

यावर स्वामी म्हणतात,सगळा हा मायेचा बाजार,त्याला फक्त स्वार्थाचा आधार.स्वार्थ असल्याशिवाय कोणी जवळ येत नाही.अन निस्वार्थी पणे मदत करणारा कधी बोलून दाखवत नाही.भगवंत आपल्याला शक्ती देतो,एवढा अमूल्य देह दिलाय पण त्याचं क्रेडिट तो कधीच घेत नाही त्यामुळे त्याला देव म्हणतात.

शेवटी स्वामी सांगतात या धकाधकीच्या जीवनात केवळ आनंद शोधण्याचा प्रयत्न कर.कारण दुःख हे येणारच आहे.जेवढं आनंदी राहता येईल तेवढं राहा कारण तुझं असणं तुझ्यासाठी महत्वाचं आहे तुझ्या कुटुंबासाठी महत्वाचं आहे.म्हणून इतरांचं सोडून दे,तुझं स्वतःच बघ.

कोणतीही गोष्ट करताना लोक काय म्हणतील हा विचार सोड.कारण लोक काय देवाला पण नावं ठेवतात.लोकं खायला मिळालं की जयजयकार करतात,त्याला खोबरं तिकडं चांगभलं म्हणतात.म्हणून तू डगमगू नकोस काम करत राहा.कारण सूर्यास्तानंतर सूर्योदय होतोच.तशाच पद्धतीने एखादा सूर्याचा किरण तुझं आयुष्य उजळून टाकेल.आणि शेवटी स्वामी आहेत की सोबत,ते बघून घेतील काय करायचं.कारण जन्म त्यांनी दिलाय रस्ता पण तेच दाखवतील.

अशाच स्वामींच्या संदेशासाठी आपल्या पेजला लाईक करा,अशी माहिती इतरांना शेअर करा, कारण आपलं कल्याण होताना दुसऱ्याच कल्याण करणं ही पण पुण्याची गोष्ट आहे.धन्यवाद.श्री स्वामी समर्थ.

Health Info Team