सूर्यकुमार यादवने पत्नीसोबत घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन, प्रचंड गर्दी..

सूर्यकुमार यादव हा भारतीय क्रिकेट संघाचा नवा स्टार आहे. या उजव्या हाताच्या फलंदाजाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियामध्ये फार कमी वेळात आपले स्थान पक्के केले. हा खेळाडू भारताचा मिस्टर 360 डिग्री खेळाडू म्हणून गणला जात आहे. सूर्याकडे सर्व प्रकारचे फटके आहेत जे सध्या क्वचितच कोणत्याही फलंदाजाकडे आहेत.
त्याचा स्वीप शॉट खूप लोकप्रिय आहे. सूर्यकुमार यादवच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने आतापर्यंत एक कसोटी, 20 एकदिवसीय आणि 48 टी-20 सामने खेळले आहेत. सूर्याने आतापर्यंत वनडेमध्ये 433 धावा केल्या आहेत, तर टी-20मध्ये त्याच्या नावावर 1675 धावा आहेत.
सूर्याने टी-20 मध्ये 3 शतके ठोकली आहेत तर एकदिवसीय सामन्यात 2 अर्धशतके केली आहेत. आपल्या खेळात पारंगत असणारा सूर्यकुमार यादव सध्या देवदर्शनात व्यस्त आहे. टीम इंडियाचा स्टायलिश फलंदाज सूर्यकुमार यादवने आंध्र प्रदेशातील सिद्ध बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांची पत्नीही त्यांच्यासोबत होती.
सूर्याने पांढरा कुर्ता पायजमा आणि कपाळावर टिळा लावत लाल ओढणी घेतली होती. तर पत्नी देवीशाने लाल सलवार कमीज परिधान केलं होत. सूर्यकुमार यादव यांनी गेल्या महिन्यात उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरातही दर्शन घेतले होते. त्यावेळी त्याचे सहकारी कुलदीप यादव आणि टीम इंडियाचे वॉशिंग्टन सुंदर हेही त्याच्यासोबत होते.
32 वर्षीय सूर्यकुमार यादवने तिरुपती बालाजीच्या दर्शनाच्या वेळी चे काही फोटोज ट्विटर आणि इतर सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये काहीतरी लिहिण्याऐवजी त्याने दोन फोटोज शेअर केले आहेत. त्याचे हे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. ‘अशीच भक्ती करत रहा,’ असं म्हणत काही चाहते त्याला प्रेम देत आहेत.
दरम्यान, नागपूरच्या पहिल्या कसोटीत संधी मिळाल्यानंतर सूर्यकुमारला दिल्ली कसोटीतून वगळण्यात आले होते, त्याच्या जागी श्रेयस अय्यर खेळला होता. आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची तिसरी कसोटी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये इंदूरमध्ये १ मार्चपासून खेळवली जाणार आहे.
दिल्लीतील सामना अवघ्या ३ दिवसांत संपला. बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकात दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये थोडे अंतर आहे. याचा फायदा घेण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू आता आपल्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवत आहेत. सूर्यकुमार यादवने पत्नीसोबत तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन भक्तीचा आनंद घेतला आहे.