कीर्तनार शिवलीला पाटीलचं घर पाहिलंत का? एवढे पैसे कमावूनही जगते खूपच साधारण आयुष्य, पहा फोटो…

ह भ प कीर्तनकार शिवलिलाताई पाटील, यांना नव्याने ओळखीची गरज नाहीये. शिवलिलाताई पाटील यांची अनेक कीर्तने इंटरनेटवर उपलब्ध आहेत. कीर्तनकार शिवलीला पाटील महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत.
त्या कौटुंबिक जीवनातील वेगवेगळे प्रसंग, समाजातील वेगवेगळ्या गोष्टी, अधूनमधून विनोदाची पेरणी करत ती कीर्तन सादर करतात. शिवलीलाची कीर्तनाची स्वतःची अशी वेगळी खास शैली आहे. शिवलीला पाटील यांचा मोठा चाहतावर्ग सोशल मीडियावर आहे.
कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी आपल्या वयाच्या तुलनेत खूप मोठी लोकप्रियता कमावली आहे. याच प्रसिद्धी आणि लोकप्रियतेमुळे, शिवलीला पाटील याना बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होण्यासाठी, मेकर्सने तैयार केले. आणि बिग बॉस मराठी या रियालिटी शोमध्ये शिवलीला पाटील यांनी आपला सहभाग नोंदवला.
मात्र त्यांना बिग बॉस मराठीमध्ये त्यांना बघताच, त्यांच्यावर टीका होऊ लागली. पाश्चिमात्य संस्कृतीवर आधारित अशा, रियालिटी शोमध्ये सहभागी होऊन ह भ प कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी वारकरी संप्रदायाचा अवमान केला आहे, असा दावा वारकरी संप्रदायाने केला.
मात्र त्यानंतर शिवलीला चांगलीस प्रकाशझोतात आली. युट्युबवर शिवलीलाचे कीर्तन चांगलेच गाजले आहेत. सोशल मीडियावर देखील शिवलीला पाटीलच्या नावाने अनेक फॅनपेजेस बघायला मिळतात. शिवलीलाची लोकप्रियता बघता ती एखाद्या सेलेब्रिटीहून कमी नाही. असं असलं तरीही शिवलीला अगदी सर्व साधारण असं आयुष्य जग जगते.
कीर्तनकार शिवलीला पाटीलचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. शिवलीला पाटील मूळची मुंबईची आहे. तिचे संपूर्ण कुटुंबच महादेवाचे भक्त आहे. त्यामुळेच तिचे नाव शिवलीला असं ठेवलं असल्याचं तिच्या आईने बिग बॉसच्या मंचावर सांगितलं होत. मध्यंतरी शिवलीलाने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी एक नव्हे तर दोन दोन गाड्या खरेदी केल्या होत्या.
तिने एक फोर व्हीलर तर एक टू व्हीलर खरेदी केली होती. शिवलीला पाटील अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातून येते. त्यामुळे आज बक्कळ पैसे कमवले असले तरीही ती साधेपणानेच आपले आयुष्य जगते. शिवलीला कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी असून तिला एक छोटी बहीण आणि लहान भाऊ देखील आहे.
आपली मुलगी कीर्तनकार बनली याचा तिच्या आई-वडिलांना खूप अभिमान आहे. आपल्या सोशल मीडियावर तिने तिच्या वडिलांसोबत अनेक फोटोज शेअर केले आहेत. यावेळी तिची छोटी बहीण देखील दिसते. तिने आपल्या बहिणींसोबतच्या काही सेल्फीज देखील सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
यामध्ये त्यांचं घर दिसत. अगदी साधारण अशा घरात शिवलीला राहते. कधी गणपतीची मूर्ती बनवताना तर कधी आपल्या नातेवाईच्या लग्नातील असे अनेक फोटोज शिवलीलाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इतकं यश, पैसे कमवून देखील शिवलीला ज्याप्रमाणे अगदी साधारण आयुष्य जगते तीच खरी वारकरी संप्रदायची ओळख आहे.