शनीची वक्र दृष्टी, कोणाला मिळणार शिक्षा आणि कोणाची बदलणार सृष्टी? वाचा!

शनीची वक्र दृष्टी, कोणाला मिळणार शिक्षा आणि कोणाची बदलणार सृष्टी? वाचा!

ग्रहांच्या स्थित्यंतरामुळे मनुष्याचे भाग्य बदलू शकते. विशेषत: जेव्हा शनि ग्रह राशींचे स्थलांतर करतो, तेव्हा आपल्या राशीला शनिदेव आले या विचारानेच लोकांना घाम फुटतो. शनिदेवांना आपण न्यायदेवता म्हणतो. ते आपल्याला आपल्या कर्मानुसार फळ देतात. आगामी स्थित्यंतराचा परिणाम कोणत्या राशीला कसा होणार ते जाणून घेऊ.

मेष- मेष राशीच्या लोकांच्या मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. जास्त रागावणे टाळा आणि बोलताना संयम ठेवा. खर्च वाढू शकतो. या काळात आरोग्याची काळजी घ्या. मन अस्वस्थ राहील, त्याचे पर्यवसान रागातही होऊ शकते. मनावर आणि वाचेवर ताबा ठेवा. आठवड्याच्या सुरुवातीला धार्मिक सहलीला जाऊ शकता. मित्रांकडून सहकार्य मिळेल.

मिथुन- कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. मनात आत्मविश्‍वास भरलेला असेल पण मन उदास राहील. देवाचे नाव घ्या. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. मात्र मनासारख्या गोष्टी न घडल्याने मन दु:खी होऊ शकते. धीर धरा. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील पण बदली होण्याची शक्यता आहे.

सिंह- कामाचा ताण वाढेल पण नोकरीत पुढे जाण्याचा मार्ग खुला होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मन प्रसन्न राहील आणि शिक्षणाच्या क्षेत्रात गोडी वाढेल.

कन्या- कौटुंबिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला नफा मिळविण्याच्या संधी मिळतील. कला आणि संगीतात रुची राहील. मन प्रसन्न राहील. मुलांकडून आनंद वार्ता समजेल.

तूळ- तूळ राशीच्या लोकांनी आरोग्याकडे लक्ष द्या. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असू शकतो. खर्चावर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवा. बोलण्यात गोडवा ठेवा.

वृश्चिक- तुमचा आत्मविश्वास चांगला असेल पण मन प्रसन्न राहणार नाही. वादविवादापासून दूर राहा आणि रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीत बदल होऊ शकतो. मित्राच्या मदतीने व्यवसायात सुधारणा होईल.

धनु- मित्रांचे सहकार्य मिळेल. संयम आणि आत्मविश्वासाचा दोन्हीची योग्य सांगड घाला. वडिलांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकतात. नवीन लोकांच्या ओळखी हितावह ठरतील. शनीच्या स्थित्यंतराचा सर्वात जास्त लाभ मकर राशीला होणार आहे. आत्मविश्वास वाढेल, खोळंबलेली कामे मार्गी लागतील. नव्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करू शकाल.

कुंभ- भावनांवर नियंत्रण ठेवा. अधिक धावपळ होईल. घरात धार्मिक कार्य करता येईल. मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. कामाचा ताण न घेता आनंदाने आलेल्या प्रसंगाला सामोरे जा. हे ही दिवस जातील.

मीन- तुमच्या व्यवसायात वाढ होईल. सत्तेतून सहकार्य आणि लाभाच्या संधी मिळतील. आदरही वाढेल. उत्पन्नाचे नवीन साधन सापडल्यामुळे तुमचा उत्कर्ष होईल. साडेसातीचा सुरुवातीचा काळ आनंदात जाईल.

Health Info Team