तुमची साडेसाती सुरु आहे! काय करावं अन् काय टाळावं?; ‘हे’ उपाय ठरतील रामबाण, शनी शुभच करेल!

तुमची साडेसाती सुरु आहे! काय करावं अन् काय टाळावं?; ‘हे’ उपाय ठरतील रामबाण, शनी शुभच करेल!

शनी ग्रह कुंभ राशीत विराजमान झाला आहे. शनी एखाद्या राशीत सुमारे २ ते अडीच वर्ष असतो, असे सांगितले जाते. यानंतर सुमारे मार्च २०२५ मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर तब्बल ३० वर्षांनी शनीने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. शनी ग्रहाच्या कुंभ प्रवेशामुळे साडेसाती चक्रात बदल झाला आहे. (importance and remedies of sade sati 2023)

शनी कुंभ राशीत विराजमान झाल्यावर मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा असेल आणि मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा प्रारंभ होईल. तर धनु राशीची साडेसाती संपुष्टात येईल. याशिवाय, मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना शनीच्या ढिय्या प्रभावापासून मुक्ती मिळेल. तर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीचा ढिय्या प्रभाव सुरू होईल. (what to do and what should not in sade sati period)

ज्या राशीची साडेसाती सुरू आहे, त्या राशीच्या व्यक्तींनी काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक आहे. आपली साडेसाती सुरू होणार असल्याचे समजते, तेव्हा जणू काही आपणावर संकट ओढावणार आहे, असा आपला समज होतो. प्रत्यक्षात साडेसाती येणे ही एक प्रक्रिया आहे. साडेसाती केव्हा येते, ते पाहणे गरजेचे आहे. (shani sade sati upay in marathi)

साडेसाती हा अनन्यसाधारण महत्त्व असणारा योग आहे. साडेसातीचा विचार हा जन्मकुंडलीतील चंद्र व गोचरी शनि यांच्याशी निगडित आहे. चंद्रापासून ४५ अंश मागे शनिचे अंशात्मक भ्रमण सुरू होते, तेव्हा साडेसाती सुरू होते व चंद्रापासून ४५ अंशापुढे शनी गेला की साडेसाती संपते.

सर्वसाधारण जन्मकुंडलीतील चंद्राच्या बाराव्या राशीत शनिने प्रवेश केला की, साडेसाती सुरू होते. ही पहिली अडीच वर्षे असतात. चंद्रराशीवरून शनिचे भ्रमण सुरू झाले की, दुसरी अडीच वर्षे व चंद्राच्या दुसऱ्या राशीत शनिने प्रवेश केला की, तिसरी अडीच वर्षे सुरू होतात. असा हा सर्व मिळून साडेसात वर्षांचा काळ म्हणून यास साडेसाती असे म्हणतात.

समजा आपली रास कुंभ आहे. तर मकर-कुंभ -मीन राशीतून होणारे शनिचे भ्रमण आपणास साडेसाती आणणारे ठरणार आहे, म्हणजे राशीस बारावा-पहिला-दुसरा शनी असताना साडेसाती असते. धनु आणि मीन या दोन्ही राशींचा स्वामी गुरु आहे. गुरु आणि शनी मित्र ग्रह मानले जातात. शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

करावे तसे भरावे या उक्तीनुसार शनी आपल्या कर्माचे फळ देत असतो, असे सांगितले जाते. शनी साडेसाती आणि ढिय्या प्रभाव असलेल्यांनी ज्येष्ठ व्यक्तींशी आदराने वागावे. नोकरीच्या ठिकाणीही सहकाऱ्यांशी चांगले वागावे. कोणाचा अनादर करत असाल तर तुम्हाला शनीच्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते. स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे

म्हणावीत. तसेच शनीची उपासना, स्तोत्र पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात.शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू, महादेव या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते. भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत. शनिदेवाचे गुण पाहून महादेवांनी त्यांना नवग्रहांमध्ये न्यायाधीशाचे स्थान दिल्याची मान्यता आहे.

साडेसाती आणि ढिय्या प्रभाव असलेल्या राशीच्या व्यक्तींनी प्रत्येक शनिवारी ११ वेळा शनी स्तोत्राचे पठण करावे. असे करणे फायदेशीर ठरू शकेल. तसेच शनिवारी काहीतरी दान करावे. शनी महादशा किंवा अंतर्दशेत दान करणे चांगले मानले जाते.

ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनीधामाची यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे. तसेच पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे.२९ मार्च २०२५ रोजी शनी कुंभ राशीतून गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. गुरु आणि शनी मित्र ग्रह मानले जातात. शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले ठेवण्याचा सल्ला दिला जातो. – सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

Health Info Team