तब्बल 24 वर्ष एकाच ताटात जेवत होती आई; निधनानंतर उघड झाले गुपितं

तब्बल 24 वर्ष एकाच ताटात जेवत होती आई; निधनानंतर उघड झाले गुपितं

आई आणि लेकरातलं प्रेम शब्दांत व्यक्त करता येत नाही. अनेकवेळा आपल्या लेकरांचं पोट भरावं म्हणून आई आपल्या पोटाला चिमटा काढून आपल्या लेकरांना खाऊ घालत असते. मुलांना मोठं करण्यात आईचा मोठा त्याग असतो. तर आईच्या प्रेमावर अनेक पुस्तकही लिहिली गेली आहेत. अनेकजण आपल्या आईच्या प्रेमाच्या गोष्टी सांगत असतो पण सध्या एका आईच्या प्रेमाची स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही स्टोरी ऐकून आपल्याही डोळ्यात पाणी येईल. एक आई मागच्या २४ वर्षापासून एकाच ताटात जेवण करायची. त्यामागचं कारणही तसंच होतं. पण आईच्या निधनानंतर या गोष्टीचे गुपित उघडे झाले आहेत. विक्रम बुद्धनेसन असं या व्यक्तीचं नाव असून त्याने आपल्या आईच्या निधनानंतर ट्वीटरवर एक पोस्ट केली आहे. आईसोबतचा एक फोटो आणि आई ज्या ताटात जेवायची त्या ताटाचा एक फोटो त्याने पोस्ट केला आहे.

“ही अम्माची प्लेट आहे, ती मागच्या २४ वर्षापासून या प्लेटमध्ये जेवत होती. ही छोटीसी प्लेट आहे. ती फक्त मला आणि माझ्या भाचीला या प्लेटमध्ये जेवण द्यायची. पण तिच्या निधनानंतर मला माझ्या बहिणीकडून या गोष्टीचं गुपित कळालं. मी सातवीच्या वर्गात शिकत असताना मला ही प्लेट बक्षिस म्हणून मिळाली होती.” असं विक्रम याने ट्वीटरवर पोस्ट करत लिहिलं आहे.

दरम्यान, “१९९९ मध्ये मी ही प्लेट बक्षीस म्हणून जिंकली होती. मागच्या २४ वर्षे आईने याच प्लेटमध्ये जेवण केलं पण तिने मला सांगितलं सुद्धा नाही. मी सध्या माझ्या आईला मिस करतोय” असं त्याने लिहिलं आहे.

Health Info Team