मुलगी झाली तेव्हा सासरच्यांनी घराबाहेर काढले, न्याय मिळवण्यासाठी स्वतः झाली न्यायाधीश.. –

मुलगी झाली तेव्हा सासरच्यांनी घराबाहेर काढले, न्याय मिळवण्यासाठी स्वतः झाली न्यायाधीश.. –

जेव्हा इरादे मजबूत असतात आणि आत्मविश्वास उंच असतो तेव्हा माणूस प्रत्येक कठीण परिस्थितीत यशस्वी होतो. मनात दृढ निश्चय असेल तर काहीही अवघड नाही. वृंदावनातील अवनिका गौतम हे या गोष्टींचे जिवंत उदाहरण आहेत. ज्यांनी त्यांच्या कठीण काळात हिम्मत हारली नाही, त्यांचा आत्मविश्वास तुटू दिला नाही.

आनंदी वैवाहिक जीवन जगत असलेली अवनिका यांच्या बाबतीत अशी एक घटना घडली कि त्या खचून गेल्या. पण त्यांनी परिस्थितीला सामर्थ्याने तोंड दिले. एवढेच नाही तर त्यांनी स्वत:ला स्वावलंबी बनवले आणि आज त्या झारखंड उच्च न्यायालयात असिस्टंट रजिस्ट्रार पदावर कार्यरत आहेत. आज त्या PCS-J म्हणजेच झारखंड लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन इथपर्यंत पोहोचल्या आहेत. पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता.

वृंदावनची राहणाऱ्या अवनिका गौतम यांच्या विवाह 2008 साली जयपूरमध्ये झाला होता. काही दिवस त्यांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होते, परंतु वेळ निघून गेल्या नंतर सासरच्यांनी हुं’ड्या’सा’ठी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली, मात्र अवनिका यांनी हे सर्व घरच्यांना सांगितले नाही आणि मूकपणे सर्व काही सहन केले.

ज्या देशात मुलींना लक्ष्मीचा दर्जा दिला जातो, त्या देशात आजही अनेक लोक आहेत ज्यांना मुलींच्या जन्माची समस्या आहे. अवनिका यांच्या बाबतीत असेच घडले. सासरच्यांनीही हुं’ड्या’सा’ठी त्यांचा छ’ळ करणे थांबवले नाही. अवनिका यांना मुलगी झाल्यावर सासरच्यांनी त्यांना घरातून हाकलून दिले, त्यानंतर त्या आपल्या मुलीसह वृंदावन येथील त्यांच्या घरी आल्या. पण त्यांनी त्यावेळी ठरवले की त्या शांत बसणार नाहीत आणि सर्वांना उत्तर देतील.

घरातून हाकलून दिल्यानंतर अवनिका यांनी आपल्या हक्कासाठी न्यायालयात जाऊन न्याय मागायचा निर्णय घेतला. पण कोर्ट आणि वकिलांच्या भोवती फिरल्यानंतर त्या इतक्या तुटल्या की त्यांनी स्वतःच प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयासह, त्यांनी 2013 मध्ये PCS-J ची तयारी सुरू केली आणि बरोबर एक वर्षानंतर 2014 मध्ये त्या यशस्वी झाल्या आणि त्यांनी झारखंड उच्च न्यायालयात सहायक निबंधक म्हणून पदभार स्वीकारला.

Health Info Team