सई ताम्हणकरने सांगितला मराठीसृष्टीत पहिल्यांदा बिकिनी घातल्यानंतरचा तो किस्सा, म्हणाली; “बिकिनी घातल्यानंतर अनेकांनी मला..”

सई ताम्हणकरने सांगितला मराठीसृष्टीत पहिल्यांदा बिकिनी घातल्यानंतरचा तो किस्सा, म्हणाली; “बिकिनी घातल्यानंतर अनेकांनी मला..”

सनई चौघडे सिनेमामधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये धडाक्यात पदार्पण करणारी सई ताम्हणकर, कधी एक सुपरस्टार बनली हे समजलंच नाही. आज केवळ मराठी सिनेसृष्टीच नाही तर, बॉलीवूडमधेही सईने आपल्या कामाचा डंका वाजवला आहे.

सई ताम्हणकरच्या पहिल्या सिनेमातील दमदार अभिनय बघून अनेकांनी तिला लंबी रेस का घोडा म्हणून संबोधलं होत, आणि आज सईने ते खरं देखील करुन दाखवलं आहे. सईने सुरुवातीपासूनच वेगळे पात्र रेखाटले आणि त्यामुळे तिचे नेहमीच कौतुक देखील करण्यात आलं होत. सईने आपल्या अभिनयाच्या जोरावर एकामाघून एक चांगल्या सिनेमात काम मिळवलं.

आणि अगदी साधारण दिसणारी सई आपल्या उत्कृष्ट अश्या अभिनय शैलीच्या जोरावर लोकप्रियेतच्या शिखरावर जाऊन पोहोचली. अमीर खानच्या गजनी सिनेमामध्ये अवघ्या काही मिनिटांचा रोल करणारी सई आज बॉलीवूडमध्ये देखील एक मोठं नाव बनलं आहे. विशेष म्हणजे आमिर खानवर तीच क्रश होत. ‘मोठं झाल्यावर त्याच्यासोबत लग्न करण्याची तिची इच्छा होती,’ असं तीन एका मुलाखतीमध्ये सांगितलं होत.

आणि बॉलीवूड मधला पहिलाच सिनेमा, तिच्या क्रश सोबत करण्याची संधी तिला मिळाली म्हणून ती स्वतःला खूप नशीबवान समजते. तिने काही मराठी मालिकांमध्ये देखील काम केले होते. मात्र अलीकडच्या काळात तिच्या बोल्ड आणि हटके अंदाजामुळे तिने आपला भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

दुनियादारी सिनेमाने तिच्या करियरला कलाटणी दिली, आणि कुठे तरी हरवून जाणारं नाव पुन्हा चर्चेत आलं. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट मराठी सिनेमामध्ये काम केले. मराठी चित्रपट ‘नो-एंट्री पुढे धोका आहे’ या सिनेमात सईने थेट बि’किनी घातली होती. मराठी सिनेसृष्टीमधे प्रथम बि’किनी घालणारी अभिनेत्री सईच आहे.

तिच्या बो’ल्ड आणि हॉ’ट अंदाजामुळं तिला हंटर या बॉलीवूडच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. आणि या संधीचा तिने पूर्ण उपयोग केला. या सिनेमात तिच्या बो’ल्डनेसने चांगल्याच चर्चा रंगवल्या. तिच्या या बो’ल्डनेस बद्दल आणि पहिल्यांदा ऑन-स्क्रीन बि’किनी घातली त्याबद्दल पिंकविलाच्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता.

त्यावर उत्तर देत सई म्हणाली, ‘मराठी चित्रपटात बि’किनी घालणं म्हणजे आज देखील खूप मोठा मुद्दा आहे. मात्र, नो-एंट्री सिनेमात मी ते धाडस केलं. बि’किनी घातली, सिन देखील व्यवस्थित पार पडला, मात्र त्यानंतर मला खूप धाक-धुक वाटत होती. पण ते सगळं व्यर्थ होत, कारण मराठी सिनेसृष्टीमधे सगळ्यांनीच त्याचा स्वीकार केला.

आश्चर्य म्हणजे सर्वानी अगदी मोकळ्या मनानं त्याच कौतुक केलं. काहींनी टी’का केली, मात्र माझ्या चाहत्यांना माझा बो’ल्डलूक खूप आवडला. आणि मला वाटतं पडद्यावर आपल्या प्रेक्षकांना जे हवं तेच आपण करतो. म्हणूनच त्यानंतर हंटर सारख्या सिनेमात देखील मी अगदी बिनधास्तपणे काम केले.’ त्यातच पुढे सई बोलली, ‘हंटर सिनेमा नंतर मला सर्व त्याच प्रकारच्या भूमिका येत होत्या.

मी त्याला कंटाळले होते आणि तोच तब्ब्ल तीन वर्षांनी लव्ह सोनीया सिनेमात मला वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळाली..’ मराठी चित्रपट ‘मला आई व्हायचंय’ च्या हिंदी रिमेक ‘मिमी’ मध्ये सई ताम्हनकरच्या कामाचे खास कौतुक करण्यात आलं होत. नवरसा या साऊथच्या वेब-सिरीजमध्ये देखील सई झळकली होती.

Health Info Team