भावाच्या लग्नात रोहित शर्माच्या बायकोने लावला ग्लॅमरचा तडका! पहा लग्नातील खास फोटो

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत खेळू शकला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे संघाची घोषणा करताना बीसीसीआयने रोहितला पहिल्या वनडेत खेळता येणार नसल्याचे जाहीर केले होते. बोर्डाने रोहितला पहिल्या वनडेतून बाहेर होण्याचे कारण वैयक्तिक कारण सांगितले.
तथापि, नंतर कळले की रोहितने आपल्या भावाच्या लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी पहिल्या वनडेपासून स्वतःला दूर केले होते. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्याने पहिल्या वनडेत टीम इंडियाचे नेतृत्व केले. मुंबईत खेळवण्यात आलेला हा एकदिवसीय सामना भारताने ५ गडी राखून जिंकला.
मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी विशाखापट्टणम येथे होणार आहे. रोहित दुसऱ्या वनडेत संघात पुनरागमन करेल. मात्र, त्यापूर्वी रोहितने आपल्या सल्याच्या लग्नात चांगलंच एन्जॉय केलं. संगीत आणि लग्नाचे काही फोटोज आणि व्हिडियोज समोर आले आहेत.
आणि सोशल मीडियावर हे फोटोज आणि व्हिडियोज चांगलेच वायरल होत आहेत. रोहितची पत्नी रितिका हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती रोहितसोबत तिचा भाऊ आणि आई-वडिलांसोबत दिसत आहे. रितिका सजदेहने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ती साडीत दिसत आहे.
रितिकाने जांभळ्या रंगाची साडी घातली आहे. यामध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. तिच्या स्टाईल आणि लूकचे सगळीकडेच कौतुक होत आहे. तिच्यासोबत रोहित शर्माही मेहंदी रंगाच्या कुर्ता पायजामामध्ये दिसत आहे. फोटोमध्ये रितिकाच्या भावासह तिचे आई-वडीलही दिसत आहेत.
या फोटोत रितिका खूपच ग्लॅमरस दिसत आहे तर हिटमॅन देसी स्टाईलमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे. रितिका सजदेहने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये तिचा भाऊ आणि त्याची पत्नी फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. भावाच्या चेहऱ्यावर मोठे हास्य आहे. हे कपल खूपच सुंदर दिसत आहे.
एक दिवसापूर्वी रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये दोघेही डान्स करताना दिसत होते. दोघे पंजाबी गाण्यांवर एकत्र थिरकताना दिसले. रितिकाला साडीत पाहून चाहते तिचे सोशल मीडियावर खूप कौतुक करत आहेत.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माने त्याचा मेहुणा कुणाल सजदेहच्या लग्नात जबरदस्त डान्स केला. गुरुवारी संध्याकाळी रोहित पत्नी रितिका सजदेहसोबत ‘गुड न्यूज’ चित्रपटातील ‘लाल घागरा’ गाण्यावर डान्स करताना दिसला. त्याचा व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाला.
रोहित शर्माचा मेहुणा कुणाल सजदेहच्या लग्नात हिटमॅन आणि रितिकासोबत त्याची मुलगी समायरा हिनेही खूप एन्जॉय केले. रितिकाने समायराचा एक फोटोही शेअर केला आहे ज्यात ती तिच्या मामा आणि मामीसोबत दिसत आहे. दरम्यान, रितिका सजदेहचा भाऊ कुणाल हा इंग्लंडमधील डेलॉइट स्पोर्ट्स बिझनेस ग्रुपमध्ये स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी मॅनेजर म्हणून काम करतो. रोहित शर्माच्या मेहुण्यानेही यापूर्वी Nexus Consulting Group- Rotman मध्ये काम केले आहे.