जर आपल्याला सुद्धा अशक्तपणा,निद्रानाश, मधुमेह अशा अनेक समस्या असतील…तर आजपासूनच चालू करा या बियांचे सेवन…परिणाम आपल्या समोर असतील

जर आपल्याला सुद्धा अशक्तपणा,निद्रानाश, मधुमेह अशा अनेक समस्या असतील…तर आजपासूनच चालू करा या बियांचे सेवन…परिणाम आपल्या समोर असतील

आपण अनेकदा फळे वा भाज्या खाल्ल्यानंतर त्यांच्या बिया फेकून देतो. मात्र, या बिया आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अशीच एक फळभाजी म्हणजे भोपळा. भोपळ्याच्या बियांच्या सेवनाने मधुमेहापासून ते हृदयाचे आजार बरे होतात.

भोपळ्यांच्या बियांमध्ये असे पोषक तत्वे असतात जी अन्य कोणत्याही बियांमध्ये नसतात. या बियांमधील मिनरल आणि झिंक ही तत्वे पुरुषांमध्ये हार्मोन्स वाढवण्याचे काम करतात. चला तर मग जाणून घेऊ भोपळ्याच्या बियांचे आपल्याला असलेले फायदे

भोपळ्याच्या बियामध्ये फायबर, जस्त आणि लोह भरपूर प्रमाणात असते.

भोपळ्याच्या बियांमध्ये अँटी फंगल म्हणजे संसर्ग रोखण्यास उपयुक्त असणारे गुणधर्म आहेत.यातील पोषण तत्त्व आपल्या शरीरामध्ये हानिकारक सूक्ष्म जीवजंतू वाढू देत नाहीत. शरीरावरील सूज कमी करून जखम भरण्यास मदत मिळते. बियांमधील औषधी गुणधर्म शरीरातील बॅक्टेरिया आणि व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत करतात.

भोपळ्याच्या बियांमध्ये अँटी व्हायरल प्रोपर्टीज आहेत. यामुळे आपल्या आरोग्याचं ताप, सर्दी-खोकल्यापासून संरक्षण होण्यास मदत मिळते. प्रत्येक दिवशी दोन ते तीन चमचे भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळू शकते.

जर तुम्हाला निरोगी केस हवे असतील तर भोपळ्याची बियाणे खाण्यास सुरवात करा

भोपळ्याच्या बी मध्ये आयर्न आणि एल लायसिनची मात्र मोठ्या प्रमाणात असते. म्हणून याच्या सेवनाने केस गळती थांबवते आणि आपल्या केसांना पोषण देते. केसांमध्ये भोपळ्यांच्या बियांचा तेल चांगला मानला जातो. या तेलाने केसांमध्ये मसाज केल्याने तेल चमकदार आणि मुलायम होतात.

भोपळा बिया खाल्ल्याने कर्करोग होत नाही

कर्करोगापासून संरक्षण:-

जे लोक बर्‍याच काळापासून भोपळ्याच्या बिया खात आहेत त्यांना आयुष्यात कधीही कर्करोग होत नाही. जर्मनीत  झालेल्या एका संशोधनानुसार, 40 वया नंतर भोपळ्याच्या बिया खाणाऱ्या स्त्रिया कर्करोगापासून अधिक सुरक्षित असतात.

भोपळ्यातील मॅग्नेशियम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतो

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर:-

भोपळ्याचे बियाणे मधुमेहामध्ये इन्सुलिनचे नियंत्रण करण्यास मदत करतात. ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात. प्रथिनांचा समृद्ध स्त्रोत असल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यास मदत करतात.

जर आपल्याला झोप येत नसेल तर भोपळा बियाणे खाण्यास प्रारंभ करा

चांगली झोप येण्यास प्रभावी:-

भोपळ्याच्या बियामध्ये सेरोटोनिन, एक न्यूरोकेमिकल असते. ज्याला निसर्गाची झोपेची गोळीदेखील म्हणतात. भोपळा बियात ट्रिप्टोफेन अधिक असत. हे एक अमीनो असिड जे शरीरात सेरोटोनिनमध्ये रूपांतरित करतो, ज्यामुळे रात्री शांत झोप लागते. झोपायला जाण्यापूर्वी मूठभर बिया खाल्ल्यास चांगली झोप मिळू शकते.

Health Info