जाणून घ्या आवळ्याचे आश्चर्यकारक असे फायदे….आपल्या अनेक रोगांना आवळा त्वरित आळा घालू शकतो…रोज करा त्याचे या प्रकारे सेवन

यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत तसेच अँटी-ऑक्सीडंट्स आणि पोषक तत्वांनी देखील आवळा समृद्ध आहे. मधुमेहा पासून ते आपल्या हाडापर्यंत अशा अनेक आजरांसाठी आवळा हा खूप फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील आवळा हा फायदेशीर मानला जातो तर चला मग जाणून घेऊया आवळ्याच्या फायद्यांविषयी.
आवळा हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी अगदी रामबाण उपाय आहे. वास्तविक, यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तसेच नियमित आवळ्याचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब देखील कमी केला जाऊ शकतो. त्यात असलेले व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी अनेकरित्या फायदेशीर आहेत.
आवळा हा आपल्या हृदयासाठीसुद्धा खूप फायदेशीर आहे. हे आपल्या शरीरात खराब कोलेस्टेरॉलची निर्मिती कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
वास्तविक, उच्च कोलेस्ट्रॉल हे हृदयरोगाचे मुख्य कारण आहे. तसेच आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास आवळ्याचा मुरांबा, आवळ्याचे चूर्ण किंवा कच्च्या स्वरुपात आवळ्याचे सेवन करावे. यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत पार पडते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे आपले पोट स्वच्छ करण्याचे कार्य करतात.
आपल्याला कदाचित माहित नसेल पण हाडे मजबूत करण्यासाठी आवळा हा प्रभावी मानला जातो. त्यात कॅल्शियमची चांगली मात्रा आढळते, ज्यामुळे आपली हाडेच मजबूत होत नाहीत तर ऑस्टिओक्लॅस्ट देखील कमी होतात.
हाडे कमकुवत करण्यासाठी जबाबदार असलेल्या पेशींना ऑस्टिओक्लास्ट्स म्हणतात. असे मानले जाते की दररोज आवळा रस पिल्याने सांधेदुखीपासूनही आपल्याला आराम मिळू शकतो.
आपल्याला आवळा वजन कमी करण्यासही उपयुक्त आहे. वास्तविक, यात अमीनो एसिड असतात जे शरीराचे चयापचय सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे आपले वजन नियंत्रित राहते. याशिवाय आपल्या शरीराची उर्जाही वाढते.
तसेच आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे, म्हणून आवळा हा आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. यामुळे आपण अनेक आजरांपासून दूर राहतो.
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींना बूस्ट करण्याचे कार्य करते आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पांढऱ्या रक्त पेशींवरच अवलंबून असते. यामुळे शरीरामध्ये या पेशी पुरेशा प्रमाणात असणं आवश्यक आहे.