खूपच सुंदर आणि हॉट दिसते ग्रेट ‘खली’ची बायको..

“द ग्रेट खली” हा भारतातील सर्वात मोठा प्रोफेशनल कुस्तीपटू आहे. आज केवळ भारतातच नाही जगभरात त्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यांनी जगभरात भारताचा नावलौकिक मिळवला आहे. WWE मध्ये पोहोचणाऱ्या भारतीय रेसलर द ग्रेट खलीचे खरे नाव दिलीप सिंह राणा आहे.
भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील सिरमौर जिल्ह्यात 1972 मध्ये जन्मलेल्या, द ग्रेट खलीने त्याच्या WWE कारकिर्दीत WWE च्या अनेक दिग्गज अशा खेळाडूंना पराभूत केले आणि भारताचे नाव कमावले. आणि आता त्याने राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत भाजपमध्ये प्रवेश केला. कुस्तीच्या जगात ‘द ग्रेट खली’चे नाव पहिले जाते.
मैदानात खलीने अंडरटेकर, रोमन रेंस, जॉन सीना आणि बतिस्ता यांसारख्या परदेशातील बड्या कुस्तीपटूंना पराभूत केले आहे. खलीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. खलीचे लग्न झाल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. खलीची पत्नी सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडमधील बड्या ब्युटींनाही मागे टाकते.
खलीच्या पत्नीचे नाव हरमिंदर कौर असून तिने दिल्ली विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. खली आणि हरमिंदर कौरच्या उंचीमध्ये खूप फरक असला तरी या जोडप्यात खूप प्रेम आहे. खली आणि त्याच्या पत्नीची पहिली भेट घरच्यांनीच आयोजित केली होती. यानंतर दोघांमधील संवाद वाढू लागला आणि या संवादाचे रुपांतर प्रेमात झाले.
कुस्तीचा बादशाह खलीचा विवाह २७ फेब्रुवारी २००२ रोजी झाला होता. खली आपल्या यशाचे सर्व श्रेय त्याची पत्नी हमिंदर कौरला देतो. खलीला एक लहान मुलगी देखील आहे जिचा जन्म 2014 मध्ये झाला होता. हरविंदर कौर आणि खली यांच्या मुलीचे नाव अवलीन राणा असून लग्नाच्या 12 वर्षांनंतर तिचा जन्म झाला.
एका मुलाखतीदरम्यान खलीने सांगितले की, तो त्याच्या पत्नीसोबत खूप रोमँटिक आहे आणि अनेकदा तिला सरप्राईज करत असतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की खली हा WWE मध्ये वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनचा किताब पटकावणारा पहिला भारतीय फायटर होता. खलीची पत्नी हरमिंदर कौर ही जालंधरमधील नूरमहल येथील रहिवासी आहे.
2006 मध्ये डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये आल्यापासून भारतात त्याच्या व्यक्तिमत्त्वाची चर्चा सुरू झाली. द ग्रेट खलीची पत्नी हरमिंदर कौरने तिच्या पतीला खूप पाठिंबा दिला आणि आज त्यानं यश आणि प्रसिद्धीचं शिखर गाठलं आहे. असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी नवऱ्याच्या मागे पत्नी असते आणि खलीची कथाही अशीच आहे. खलीने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, त्याच्या कारकिर्दीच्या या यशामागे त्याची पत्नी हरमिंदरचा मोठा हात आहे, परंतु ती लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.