रोज पूजा करताना या गोष्टी ठेवा लक्षात…अन्यथा त्या पूजेचा आपल्याला काहीही फायदा होणार नाही…जाणून घ्या त्या गोष्टी

रोज पूजा करताना या गोष्टी ठेवा लक्षात…अन्यथा त्या पूजेचा आपल्याला काहीही फायदा होणार नाही…जाणून घ्या त्या गोष्टी

आपल्याला माहित आहे की देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते आणि आई लक्ष्मीची जर आपण विधिवत पूजा केली तर आपल्या आयुष्यात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही. तरी आपण बर्‍याच वेळा मां लक्ष्मीची पूजा करतो, परंतु पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही आणि आपल्या घरात पैशाची कमतरता येते.

त्यामुळे जर आई लक्ष्मीची मनापासून पूजा केली गेली नाही तर, त्या पूजेचा काही सुद्धा परिणाम होत नाही. म्हणून, जेव्हा जेव्हा आपण आईची पूजा करता तेव्हा मनापासून पूजा करावी. त्यामुळे जर आपण सुद्धा या पद्धतीने पूजा केली तर नक्कीच आपली पूजा यशस्वी होईल आणि आपल्याला आशीर्वाद मिळतील. चला तर मग जाणून घेऊया या की पूजेची योग्य पद्धत काय आहे.

पूजा पद्धत:-

सकाळी उठून स्नान करा. त्यानंतर मंदिर पूर्णपणे स्वच्छ करा आणि नंतर आईची मूर्ती किंवा फोटोस फुले व फळे अर्पण करा.

आई लक्ष्मीला सुगंध खूप आवडतो, म्हणून पूजा करताना आपण धूप किंवा अत्तर लावावे.

पूजा करण्यापूर्वी देवीच्या पायावर एक रुपयाचे नाणे ठेवा.

देवीच्या फोटोसमोर दिवा लावा, लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा लक्ष्मीची पूजा करता तेव्हा फोटोसमोर तूपचा दिवा लावावा.

दीप प्रज्वलनानंतर देवीशी संबंधित मंत्रांचा जप करावा आणि आईची आरती करावी. दररोज अशा प्रकारे आईची उपासना करा.

आपल्याला माहित असेल की शुक्रवार हा लक्ष्मी आईशी संबंधित आहे. म्हणून या दिवशी आईची विशेष पूजा करावी आणि शक्य असल्यास उपवास ठेवा.

हे उपाय करा:-

पूजेबरोबरच तुम्ही खाली नमूद केलेले उपायदेखील केले पाहिजेत. या उपायांनी माता लक्ष्मी प्रसन्न होतात.

अनावश्यक पैसा खर्च होत असेल तर दररोज आईच्या चरणी कमळाची फुले अर्पण करा. असे केल्याने खर्च कमी होईल आणि पैशांची भर पडेल.

पैशांची अडचण असल्यास मंदिरात जाऊन आईसमोर पाच दिवे लावा आणि कमळाची माला अर्पण करा.

आई लक्ष्मी ही पिंपळाच्या झाडावर राहत असते, म्हणून या झाडाची पूजा करा आणि या झाडासमोर दिवा लावा.

या गोष्टी लक्षात ठेवा:-

तुटलेल्या कंगव्याने कधीही आपले केस विचरु नका, असे केल्याने आई लक्ष्मी आपल्यावर रागावली जाईल.

आपल्या घरात लावलेला दिवा कधीही फुक मारून विजवू नका.

नेहमी स्वच्छ पायांनी झोपा, म्हणजेच रोज आपण फ्रेश होऊनच झोपावे.

रात्री स्वयंपाकघर स्वच्छ करा. खरकटी भांडी कधीही स्वयंपाकघरात ठेवू नका, असे केल्याने लक्ष्मी घरी राहत नाही.

सूर्यास्तानंतर कधीही झुडू मारू नका आणि कधीही पायाने झाडूला स्पर्श करू नका. ज्या घरात साफसफाई केली जाते तिथेच लक्ष्मी वास्तव करते. म्हणून आपल्या घराला कधीही गलिच्छ ठेवू नका.

Health Info Team