कपूर कुटुंबात पुन्हा पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, पहा फोटो..

कपूर कुटुंबात जणू आनंदाची ला’टच उ’सळली आहे. रणबीर आणि आलियाच्या लेकीच्या जन्मानंतर, बॉलीवूड आणि चाहत्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या मुलीची एक झलक बघण्यासाठी सर्वचजण आतुर आहेत. कपूर कुटुंबाने देखील आपल्या राजकुमाराचे अगदी जल्लोषात स्वागत केले.
छोट्या राहाचे जंगी स्वगत झाले. आता अजून एक गुडन्यूज कपूर कुटुंबातून समोर आली आहे. पुन्हा एकदा कपूर कुटुंबात पाळणा हलणार आहे. बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा भाऊ अरमान जैन आणि त्याची पत्नी अनिसा मल्होत्रा पहिल्यांदाच आई-वडील होणार आहेत. अरमान जैन हा करीना कपूरची आत्या रीमा कपूर आणि मनोज जैन यांचा मुलगा आहे.
आणि नुकतंच कपूर कुटुंबात अनिसा मल्होत्राचा बेबी शॉवर सोहळा पार पडला. या सोहळ्यात सर्व लोक आई-वडील आणि होणाऱ्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी आले होते. नव्या पाहुण्याच्या आगमनाचा आनंद संपूर्ण कपूर कुटुंबात स्पष्ट दिसत होता. नीतू कपूरपासून ते आलिया भट्टपर्यंत कपूर कुटुंबातील जवळपास सर्वच जण सोहळ्याच्या फोटोमध्ये दिसत आहेत.
यावेळी आलिया भट्ट सोबतच नव्या नवेली नंदा, नीतू कपूर, रीमा जैन, नताशा नंदा यांनी ट्रेडीशनल आणि सुंदर कपडे घातले होते. या अगदी सिम्पल आणि डिझायनर कपड्यांमध्ये कपूर कुटुंबातील सर्वचजण खूप सुंदर दिसत आहेत. या कर्यकर्मातील एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये संपूर्ण कपूर, जैन आणि नंदा कुटुंब अरमान जैन आणि अनिशा मल्होत्रा यांना त्यांच्या नवीन सुरुवातीसाठी आशीर्वाद देताना दिसत आहे.
फो’टोंमध्ये आलिया हिरव्या रंगाचा लांब मिडी ड्रेस परिधान करताना दिसत आहे. त्याचवेळी नीता अंबानीही सिंपल लूकमध्ये दिसल्या. त्या आपल्या भाचीचे अभिनंदन करण्यासाठी आल्या होत्या. या फंक्शनमध्ये करीना पेस्टल ग्रीन सलवार सूट घालून पोहोचली होती. ज्यावर एम्ब्रॉयडरी मोटिफ्स दिसत होते.
तिचा सलवार सूट सिल्क फॅब्रिकचा होता, ज्यावर तीन सुंदर असा दुपट्टा घेतला होता आणि मॅचिंग शूज घातले होते. तिच्या हातात एक मोठी पुप बॅग दिसत होती. दुसरीकडे, स्लीक पोनीटेल, बिंदी आणि किमान मेकअपसह डायमंड ड्रॉप इअरिंग्जमध्ये तिचा लूक खूपच सुंदर दिसत होता. तर, अनिसाने निळ्या आणि सिल्व्हर रंगाची साडीची निवड केली.
सुंदर साडीवर चंदेरी रंगाच्या धाग्यांनी फुलांची नक्षी केली होती आणि अनिसा तिचा बे’बी बं प फ्लॉंट करताना दिसली. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. पारंपारिक पद्धतीने साडी नेसून तिने हिऱ्यांचे दागिने सोबत नेले होते. चोकर नेकपीस, कानात ड्रॉपडाऊन झुमके आणि हातात बांगड्या दिसत होत्या.
दरम्यान, रणधीर कपूरने यांनी देखील, सून अनीशा मल्होत्राच्या बेबी शॉवरला हजेरी लावली होती. यावेळी ते त्यांच्या केअर टेकरचा आधार घेऊन चालताना दिसले. या कर्यक्रमामध्ये टीना अंबानीही दिसल्या. टीना आणि रीमा या दोघींमध्ये चांगले बाँ’डिंग असल्याचं सांगितलं जात.