कोल्हापुरात विधवा आईला मुलाने केलं ‘सौभाग्यवती’…!

कोल्हापुरात विधवा आईला मुलाने केलं ‘सौभाग्यवती’…!

आईवडील हे मुलांचे लग्न लावून देतात. मात्र, कोल्हापुरात एका तरुणाने आपल्या वडिलांच्या निधनानंतर आईचा पुनर्विवाह लाऊन देण्याचे क्रांतिकारक पाऊल उचलले. कोल्हापुरातील युवराज शेले या तरुणाने हा धाडसी निर्णय घेतला. पती पत्नी हे आयुष्यभराचे जोडीदार असतात. मात्र काही कारणास्तव वेगळे

झाले किंवा अपघाती मुत्यू झाला. तर जोडीदार एकटा पडतो. अशा वेळी पुरुष दुसरे लग्न करतात. पण शक्यतो तर महिला दुसरे लग्न करण्यास तयार नसतात. त्यात जर वय जास्त झाले असल्यास दुसरे लग्न करण्यास टाळतात. मात्र कोल्हापूर मध्ये मुलानेच विधवा आईचा पुनर्विवाह लावून दिला. मुलाने आईच्या आयुष्यात पुन्हा आनंद आणला. त्याच्या या  निर्णयाचे सगळीकडे कौतुक होत आहे.

कोल्हापूर मध्ये त्याची आई रत्ना वडील नारायण आणि मुलगा युवराज असे याचे छोटे कुटूंब रहात होते. पण दुदैवाने वडिलांचा अपघाती मुत्यू झाला. त्यानंतर युवराजची आई एकटी पडली. युवराज हा भजन करत असल्यामुळे तो जास्त करुन बाहेर गावी रहात. त्यामुळे त्याची आई हि एकटीच घरी रहात.

वडिलांच्या मुत्यू नंतर त्याच्या आईच्या कपाळावर कुंकू, हातात चुडा दिसत नव्हता. त्याची आई नेहमी उदास राहायची. त्याच्या आईच्या चेहऱ्यावरील उदासीनता पाहून त्याने आईचे दुसरे लग्न लावून देण्याचे ठरवले. मात्र आईला हि गोष्ट मान्य नव्हती. आईने दुसरे लग्न करण्यास नकार दिला. मात्र युवराजने नातेवाईकांना सांगून आईला तयार केले. त्याने आईसाठी नात्यातीलच मारुती यांची निवड केली. आणि १२ जानेवारीला त्यांचे लग्न लावून दिले. युवराजच्या या धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

kavita