जर आपण सुद्धा हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवत असाल…तर त्वरित सावध…नाहीतर आपल्या आरोग्याला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात

आपल्याला माहित आहे की फ्रीजचा शोध हा मानवांसाठी वरदान ठरला आहे. बर्याच काळासाठी कोणतीही वस्तू ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे फ्रीज. पण लोक आजकाल सर्व काही फ्रीजमध्ये ठेवू लागले आहेत. ज्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नयेत त्या देखील त्या देखील आजकाल फ्रीजमध्ये ठेवल्या जाऊ लागल्या आहेत.
नकळत लोक फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक करतात. पण बर्याचदा लोक बाजरातून आणलेले लिंबू बराच काळ ताजे राहण्यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवतात. पण लिंबू फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे का? तर मग आज आम्ही आपल्याला सांगू की, लिंबाबरोबर इतरही कोणत्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नयेत. असे केल्याने या गोष्टी फायदा होण्याऐवजी हानी पोचवतात.
सर्व प्रथम, आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की लिंबू कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. निंबू, संत्री यासारखी सिट्रिक अॅसिड असलेली फळे फ्रिजमध्ये ठेवू नये. कारण त्यांना थंड तापमान सहन होत नाही.
त्यांच्या सालीवर डाग पडतात. त्यांच्या चवीवरही परिणाम होतो. फ्रिजमध्ये अशी फळं ठेवल्यामुळं त्याच्यातील रस नष्ट होतो. आपल्याला अद्यापही लिंबू रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचा असेल तर प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा.
खूप दिवस टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे टोमॅटोमधील पाण्याचं प्रमाण कमी होते. थंड तापमानामुळे ते लवकर खराब होतात. त्यांचा रंगही बदलून जातो. असे टोमॅटो भाजी करण्यासाठी वापरल्यास आरोग्याला हानी होऊ शकते.
केळींना सामान्य तापमानातच ठेवलं पाहिजे. फ्रिजमध्ये केळी ठेवल्यामुळं ती काळी पडतात. ती बेचव लागतात. केळींना नेहमीचं प्लॅस्टिकच्या पिशवीत झाकून ठेवावीत. जर तुम्ही केळी फ्रीज मध्ये ठेवाल तर याची साल गळून पडेल. साल गळून पडल्याने केळींचे आयुषमान घटते. याशिवाय त्याची चव देखील बदलते.
म्हणजे ताजी केळी खाताना तुम्हाला जी चव मिळते ती चव फ्रीज मध्ये ठेवलेली केळी खाताना येत नाही. तर मंडळी आता तुमच्या लक्षात आले असेलच की हे पदार्थ फ्रीज मध्ये ठेवल्याने काय नुकसान होते. त्यामुळे उन्हाळ्यात किंवा बाहेर जास्त उष्णता असतानाही अजिबात हे पदार्थ फ्रीज मध्ये ठेवू नका. त्यांची खरी जागा ही बाहेर खेळत्या हवेतच आहे.
सफरचंद फ्रिजमध्ये योग्य पध्दतीने ठेवले नाही तर ते लवकर खराब होऊ शकतात. जर हे फळ आपल्याला फ्रिजमध्ये ठेवायचे असल्यास कागदात गुंडाळून भाज्या ठेवण्यासाठी असलेल्या खालच्या भागातच ठेवावे. कमी तापमनामुळे हे फळ लवकर पिकतं आणि खराब होऊ शकतं.
शंभर पैकी 99 लोक फ्रीजमध्ये ब्रेड ठेवण्याची चूक करतात. ब्रेफ्रीज ब्रेडमधली आर्द्रता शोषून घेते ज्यामुळे ब्रेड वेळे आधीच शिळा होऊ शकतो. त्यामुळे ब्रेड ठेवायचाच झाल्यास तो प्लास्टिक पिशवीमध्ये गुंडाळून ठेवावा. अन्यथा ब्रेड खराब होण्याची शक्यता असते.
लसूण जर आपल्याला जास्त दिवस चांगले राखायचे असतील तर त्यांना कधीच फ्रीज मध्ये ठेवू नका. ते अशा जागी ठेवा जेथे अजिबात आर्द्रता नसेल आणि हलका सूर्यप्रकाश असेल. फ्रीज मध्ये लसूण ठेवल्याने लसणाची चव खराब होते आणि त्याचा कुबट वास सुद्धा येऊ लागतो. म्हणजे जर समजा आपण फ्रीज मध्ये लसूण आणि दूध एकत्र ठेवले असेल तर दूध पिताना आपल्याला लसणाचा सुद्धा वास येऊ लागेल.
कांदा हा कधीच फ्रीज मध्ये ठेवू नये. आपल्या घरात उघड्यावर योग्य रूम टेम्परेचर मध्ये कांदा सुस्थितीत राहतो आणि जास्त वेळ टिकतो. फक्त एकच अट म्हणजे यावर सूर्याची थेट किरणे पडू देऊ नयेत.
अंधाऱ्या खोलीत खेळकर हवा असणाऱ्या जागेत कांदे ठेवावेत. कांद्यात जास्त आर्द्रता असल्याने फ्रीजच्या थंड वातावरणात ते अधिक जलद गतीने खराब होतात. जर आपल्याला कापलेला कांदा स्टोर करायचा असेल तर एका हवाबंद डब्यात तो कांदा ठेवून मगच तो डब्बा फ्रीजमध्ये ठेवावा.
बटाटा म्हणजे आपल्या रोजच्या आहारातील एक अविभाज्य भाग होय. बटाटा हा बाहेरच्या वातावरणात खूप दिवस चांगला राहतो आणि लवकर खराबही होत नाही.
कारण यामध्ये स्टार्च भरपूर प्रमाणत असते आणि म्हणून उघड्या जागेत खेळती हवा असलेल्या जागेत ठेवलेले बटाटे जास्त वेळ चांगले राहतात. जर आपण बटाटा फ्रीज मध्ये ठेवला तर त्यातील स्टार्च फ्रीजच्या थंड वातावरणात रासायनिक रुपात दुभंगते. यामुळे स्टार्चची चव बदलते आणि बटाटे खायला चांगले लागत नाहीत.
जर टरबूज फ्रीज मध्ये ठेवल्यावर सगळ्यात मोठी समस्या ही निर्माण होते की याच्यासोबत फ्रीज मध्ये इतर जे काही पदार्थ असतील त्यांनाही टरबूजाचा वास येऊ लागतो.
याशिवाय यातील अँटीऑक्सीडेंटचा प्रभाव सुद्धा कमी होत जातो आणि यातील पोषकता निघून जाते. दुसरी गोष्ट ही की टरबूज जास्त दिवस फ्रीज मध्ये ठेवल्याने त्याची नैसर्गिक चव निघून जाते. या ऐवजी टरबूज काही वेळ पाण्यात भिजवून ठेवणे उत्तम!