जर आपण सुद्धा यावेळी दूध पीत असाल…तर त्वरित सावध व्हा…आपल्याला हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो…जाणून घ्या दूध पिण्याची योग्य वेळ

जर आपण सुद्धा यावेळी दूध पीत असाल…तर त्वरित सावध व्हा…आपल्याला हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो…जाणून घ्या दूध पिण्याची योग्य वेळ

दूध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. लहान मुलापासून ते वडीलधाऱ्यापर्यंत, सर्वजणच दूध पितात कारण त्यात अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. तसेच दूध पिण्यामुळे आपली हाडे मजबूत होतात कारण त्यात भरपूर कॅल्शियम असते.

तथापि, आपण बर्‍याच जणांच्या तोंडून ऐकले असेल की काही लोकांना दूध योग्य नसते. दूध पिण्यामुळे त्यांना गॅसची समस्या येऊ लागते. त्यांचे पोट फुगू लागते. वास्तविक, या सर्व समस्या चुकीच्या मार्गाने दूध प्यायल्यामुळे उद्भवतात. आज आम्ही आपल्याला काही दूध कधी आणि केव्हा सेवन करावे ते सांगणार आहोत, त्यानुसार जर दुग्ध केले तर काहीच हरकत नाही.

जुन्या काळात लोक सरळ गाय व म्हशीचे दूध खरेदी करायचे. त्या दुधाची गुणवत्ता सुद्धा खूप चांगली असायची. पण आजच्या काळात लोक दुकानातून पॅकजेड दूध खरेदी करतात.

आता अगदी पॅकेटमध्ये सुद्धा दूधही येऊ लागले आहे. तसेच दुधाच्या बाटल्यांचे उत्पादनही सुरू केले आहे. यानुसार जर तुम्ही वेळी-अवेळी कोणत्याही अन्नपदार्थांचं सेवन केलं तर या तत्त्वांचं संतुलन बिघडतं आणि आपल्याला आजारांची लागण होते. बहुतांश लोक दुधाचं नियमित स्वरुपात सेवन करतात. पण दूध पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहिती आहे का? आयुर्वेदानुसार दूध कोणत्या वेळेस प्यावे, हे जाणून घेऊया.

दुधाचे सेवन सकाळी नाश्त्यामध्ये केले जाऊ शकते. पण यावेळेस नाश्त्यामध्ये मिठाचा समावेश असलेल्या अन्य कोणत्याही अन्नपदार्थांचा सेवन करू नये. दुधासोबत कधीही मीठयुक्त पदार्थ खाणे टाळावे. तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळेस दुधाचे सेवन करू शकता. पण दूध पिण्यापूर्वी तसंच प्यायल्यानंतर लगचेच कोणतेही खारट किंवा मीठ असलेले पदार्थ खाऊ नये.

नॅशनल डेअरी काउंसिलनुसार, आपल्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी आवश्यक असलेल्या पौष्टिक घटकांचा दुधामध्ये समावेश आहे. आपल्या शरीराला एकूण नऊ पौष्टिक घटक दुधाद्वारे मिळतात.

रात्रीचे जेवण केल्यानंतरही तुम्ही दुधाचे सेवन करू शकता. पण रात्री जेवण आणि दूध पिण्याच्या वेळेमध्ये तुम्हाला किमान दोन तासांचे अंतर ठेवावे लागेल. तेव्हाच तुमच्या शरीराला संपूर्ण लाभ मिळू शकतील.

-जेवणानंतर लगेचच दूध प्यायल्यास फूड पॉयजनिंग, गॅस, अपचन, उलटी होणे, पोट दुखणे, जुलाब यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. कारण दूध आणि तेल तसंच मीठ युक्त जेवण दोन्ही परस्पर विरोधी प्रकृतीचे आहेत.

डोपामाइन हार्मोन तणावमुक्त करून आपला मेंदू शांत करण्याचे कार्य करते. यामुळेच दूध प्यायल्यानंतर आपल्याला शारीरिक तणाव कमी झाल्याचे जाणवते. यामुळे मन आणि मेंदू दोन्ही शांत होते.

– हळदीचे दूध प्यायल्यास थकवा आणि शारीरिक वेदना देखील दूर होतात. कारण हळद शरीरासाठी नैसर्गिक स्वरुपातील पेन किलर प्रमाणे कार्य करते.

दूध प्यायल्यानं आपल्या शरीराला कॅल्शियमचा पुरवठा होतो आणि मेंदूचीही योग्य वाढ होते. ही बाब साधारणतः लहान मुलांसाठी योग्य मानली जाते. कारण मोठ्या व्यक्तींचा असा समज असतो की त्यांचा मेंदूचा विकास झालेला आहे.

– पण ही गोष्ट पूर्णतः चुकीची आहे. वयोवृद्ध व्यक्ती जर दुधाचे सेवन करत असतील तर त्यांच्या मेंदूला यापासून कोणतेही लाभ मिळत नाही.

एखाद्या पदार्थाचं अतिप्रमाणात सेवन केल्यास त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात. ही बाब दुधासंदर्भातही लागू होते. जर तुम्ही दिवसभर केवळ दुधाचंच सेवन करत असाल तर तुमच्या आरोग्यावर याचे वाईट परिणाम होतील. दुधाचं अति सेवन केल्यास हृदयरोग होण्याचा धोका असतो.

 

Health Info Team