मार्च महिन्यात ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? गुरूदेवाच्या आशीर्वादाने होऊ शकतात मालामाल

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रहाचा उदय होतो. त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर झालेला पाहायला मिळतो.
वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये बृहस्पति गुरुदेव यांच्या चालीत होणारा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण बृहस्पति हा वृद्धी आणि समृद्धीचा कारक आहे.
देवगुरु बृहस्पती हे धन, संपत्ती, ऐश्वर्य, सुख-सुविधा इत्यादींचे कारक मानले गेले आहेत. बृहस्पति ग्रहाच्या जन्मपत्रिकेत शुभ स्थिती असेल तर व्यक्तीला कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही, असे मानले जाते.
मार्च २०२३ मध्ये गुरु ग्रहाचा उदय (Jupiter Rise In March 2023) होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल.
दुसरीकडे, बृहस्पति उदय होऊन धन राजयोग बनवत आहे. यामुळे अशा काही राशी आहेत, ज्यांना गुरू ग्रहाचा उदय होताच अचानक संपत्ती आणि सुख-समृद्धी मिळण्याची शक्यता दिसत आहे.
बृहस्पतिचा उदय काही राशींसाठी भाग्यवान ठरणार आहे. त्यांना करिअर आणि व्यवसायात भरभरुन यश मिळण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी.
गुरू ग्रहाचा उदय कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण बृहस्पति तुमच्या राशीतून दुसऱ्या भावात उदयास येणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला आर्थिक बाबतीतही यश मिळू शकते. यावेळी तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता दिसत आहे.
बृहस्पति तुमच्या राशीतून दहाव्या भावात प्रवेश करणार आहे. त्यामुळे जे बेरोजगार होते त्यांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. तसंच जे व्यापारी आहेत त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. गुरूचा उदय कर्क राशीसाठी खूप फायदेशीर ठरु शकतो.
मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरूचा उदय शुभ ठरु शकतो. तुमच्यासाठी गुरूचा उदय करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो. कारण गुरु तुमच्या राशीतून दशम स्थानात उदयास येणार आहे . त्यामुळे या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायात चांगले यश मिळू शकते.
मीन राशीच्या लोकांसाठी गुरू ग्रह असणे फायदेशीर ठरु शकतो. मीन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता आहे. कारण बृहस्पति तुमच्या राशीतून दुसऱ्या भावात उदयास येईल. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली सुधारू शकते. तसंच यावेळी तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात.