अंड्याच्या आतील पिवळा बलक घातकच… संशोधनातून ही बाब आली समोर…याप्रकारे सेवन केल्यास मृत्यूला देखील कारणीभूत ठरू शकते हे बलक

अंड्याच्या आतील पिवळा बलक घातकच… संशोधनातून ही बाब आली समोर…याप्रकारे सेवन केल्यास मृत्यूला देखील कारणीभूत ठरू शकते हे बलक

पूर्वीच्या संशोधनात अंड्यातील पिवळा बलक वाईट असल्याचे मांडले होते; पण अलीकडे असा कुठलाही धोका नसल्याचे पाश्चिमात्य आहारतज्ज्ञांनीच सांगून टाकल्यामुळे पूर्वीचे संशोधन मागे पडले. मात्र, गेल्या आठवड्यात पुन्हा एका नवीन संशोधनातून,

अंड्याचा पिवळा बलक हृदयरोग, पक्षाघाताला आमंत्रण देणारा असल्याचा दावा केला आहे. एवढेच नव्हे तर पिवळ्या बलकासह अंड्यांचे अतिरिक्त सेवन हे मृत्युलादेखील काही प्रमाणात कारणीभूत ठरू शकते, असेही संशोधनातून मांडले आहे.

तब्बल १७ ते १८ वर्षांच्या संशोधनात सुमारे ३० हजार व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. त्यातून विविध निष्कर्ष काढले. त्यानुसार, दररोजच्या आहारातील अर्धे अतिरिक्त अंडेदेखील हृदयरोगाचा धोका ६ टक्क्यांनी वाढवते, तर मृत्युचा धोका ८ टक्के वाढतो.

एका अंड्यामध्ये १८६ मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते आणि दररोज प्रत्येक ३०० मिलीग्राम अतिरिक्त ‘डाएटरी कोलेस्ट्रॉल’मुळे १७ टक्के हृदयरोग (कार्डिओव्हॅस्कुलर डिसीज) जडण्याची आणि त्याचबरोबर हृदयरोग किंवा पक्षाघातामुळे मृत्यू होण्याची शक्यताही १८ टक्के वाढते.

यामध्ये १४ टक्के हार्ट फेल्युअर, तर २६ टक्के पक्षाघाताची शक्यता वाढू शकते. तसेच महिलांना हा धोका जास्त असून, २८ टक्के महिलांचे मृत्यू हे दोन्ही कारणांमुळे होऊ शकतात, असेही संशोधनात नमूद केले आहे.

त्याचवेळी ज्या व्यक्ती पूर्णपणे आरोग्यपूर्ण आहार घेतात, त्यांनीदेखील त्यांच्या आहाराशिवाय अर्ध्या अंड्याचे अतिरिक्त सेवन केले तरीदेखील अशा व्यक्तींमध्ये हृदयरोगाची शक्यता वाढते, असेही संशोधनात नमूद केले आहे. अर्थात वय, व्यक्ती, शारीरिक हालचाल, व्यायाम, सवयी, मधुमेह,

रक्तदाब, बीएमआय, हृदयरोग आदी बाबींनुसार अतिरिक्त ‘डाएटरी कोलेस्ट्रॉल’चे (अंडी, मटन, स्निग्ध आदी पदार्धातून मिळारे कोलेस्ट्रॉल) दुष्परिणाम संभवतात, असेही यात म्हटले आहे.

महत्वाचे म्हणजे मानवी शरीराला अंड्यांची मुळात गरज नाही. त्यामु‌ळे त्यांचे सेवन टाळलेले चांगले आणि शरीराला गरजेचे असलेले कोलेस्ट्रॉल शरीर आपसुकच तयार करते आणि अंड्यांमध्ये असलेली पोषक तत्वे इतर आरोग्यपूर्ण आहारातून मिळू शकतात, असाही ‘बॉटम लाइन’ संदेश संशोधनातून दिला आहे.

संशोधनाबाबत डॉ. आनंद देशमुख म्हणाले, ‘शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि खाण्यातील कोलेस्ट्रॉलचा संबंध नसल्याचे मानण्यात येत होते. मात्र, या संशोधनामुळे अंड्याचा पिवळा बलक वाईट असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

प्रत्येक अंड्यामध्ये १७० ते २०० मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते आणि त्यामुळे त्याचे अतिरिक्त सेवन हृदयरोगाला आमंत्रण देणारे ठरू शकते. अंडी खायचीच असतील तर पिवळा बलक काढून खावी.’ प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजित भागवत म्हणाले,

‘हे संशोधन ‘रेस्टोस्पेक्टिव्ह केस-कंट्रोल स्टडी’ या सदरात मोडते. अशा प्रकारच्या अभ्यासात मूलत:च काही त्रुटी असतात की ज्यामुळे निष्कर्षात संदिग्धता येऊ शकते. अशा संशोधनाला ‘हायपोथेसिस जनरेटिंग’ म्हणतात. यामुळे अंडी खावीत की नाहीत, याबद्दल कोणताही ठोस निष्कर्ष यामधून निघू शकतो, असे वाटत नाही. यावर अधिक संशोधनाची गरज आहे.

रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढले की हृदयविकार हमखास जडतो. मात्र, ‘डाएटरी कोलेस्ट्रॉल’मु‌ळे असा कोणताही धोका नसल्याबाबत काही आहारतज्ज्ञांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या दीर्घ संशोधनाने ‘डाएटरी कोलेस्ट्रॉल’चा हृदयरोगाशी संबंध स्पष्ट झाला आहे.

Health Info Team