तुळशीची वनस्पती वाळल्यावर फेकून देण्याची चूक करू नका ….नाहीतर गंभीर परिणामांना सामोरे जाल

तुळशीची वनस्पती वाळल्यावर फेकून देण्याची चूक करू नका ….नाहीतर गंभीर परिणामांना सामोरे जाल

तुळशीची वनस्पती अतिशय पवित्र मानली जाते आणि या वनस्पतीचे पूजन केल्यास पुण्यप्राप्ती होते. तुळशीच्या वनस्पतीबद्ल शास्त्रात असे लिहिले आहे की ही वनस्पती भगवान विष्णूला खूप प्रिय आहे आणि त्याची पूजा केल्यास भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो. एवढेच नाही तर विष्णूची पूजा करताना तुळशीची पानांचा जरूर वापर करावा. असे मानले जाते की विष्णूची पूजा करताना तुळशीची पाने अर्पण नाही केलीत तर पूजेची पूर्ण फळं मिळत नाहीत. अशी एक भावना आहे.

धार्मिक महत्व आहेच त्या व्यतिरिक्त या वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म देखील आहेत आणि ही वनस्पती घरात असल्यास कीटकांपासून आपले घर दूर राहते. चला तर मग पाहूया तुळशीच्या वनस्पती संबंधित काही खास गोष्टी –

लक्ष्मीचे रूप आहे:-

तुळशीची वनस्पती लक्ष्मी देवीचे रूप मानले जाते. तर जे लोक रोज तुळशीसमोर दिवा लावतात. त्याना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. त्याचबरोबर घरात आनंद आणि शांती नांदते. म्हणून जर पैशांची कमतरता भासत असेल तर दररोज तुळशीची पूजा करावी आणि रोज तेल किंवा तूपाचा दिवा लावावा.

घरातील दोष नाहीसे होतात:-

घरात तुळशीची वनस्पती असेल तर वास्तू दोष नाहीसा होतो. वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांच्या घरात वास्तू दोष आहे.त्या लोकांनी घराच्या अंगणात तुळशीची लागवड करावी. असे केल्यास घरातील सर्वे वास्तू दोष नाहीसे होतात व घराची भरभराट होते.

तुळशीच्या पानांचे सेवन लाभदायक असते:-

तुळशीची पानेही खूप पूर्वीपासून खाल्ली जातात. रोज तुळशीची पाने खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. तुळशीची पाने अनेक प्रकारे वापरली जाऊ शकतात.आपण तुळशीच्या पानांचा काढा पिऊ शकता किंवा चहामध्ये देखील वापरू शकता. तुळशीचे पाने रोज खाल्ल्यास दम्यासारख्या आजारांपासून मुक्तता होते.

घरी सुख नांदते:-

घरी वारंवार भांडण होत असेल तर आपण घरी तुळशीची वनस्पती आणा. घरात तुळशीची वनस्पती आणल्याने घराचे वातावरण चांगले होते आणि घर आनंदी राहते.

नकारात्मक शक्तींपासून दूर राहतो:-

घरात नकारात्मक शक्ती जाणवत असेल तर तुळशीच्या वनस्पतीची पूजा करावी. या वनस्पतीची घरात राहून पूजा केल्यास नकारात्मक उर्जा दूर होते.

या गोष्टी लक्षात ठेवा:-

शास्त्रात तुळशीच्या वनस्पतीचा संदर्भ देताना असे लिहिले आहे की एकादशी रविवार आणि मंगळवार या वनस्पतीची पाने तोडू नयेत. म्हणून या दिवसात तुळशीची पाने तोडू नका.

तुळशीची वनस्पती नेहमीच योग्य दिशेने ठेवा. तरच तुम्हाला फायदा होईल. वास्तुशास्त्रानुसार ही वनस्पती फक्त ईशान्य दिशेने ठेवावी. त्याच वेळी ही वनस्पती कधीही घरात ठेवू नका. ही वनस्पती अंगण किंवा गच्चीवर ठेवली जाते.

तुळशीची वनस्पती वाळली असेल तर टाकू नका. वास्तविक बरेच लोक वनस्पती वाळली असताना कोठेही फेकतात जे चुकीचे आहे. तुळशीची वनस्पती वाळली पडल्यावर तिला नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये सोडून द्यावे.

Health Info Team