दूध पिण्याचे तोटे… जर आपण या पद्धतीने आणि यावेळेला दूध पीत असाल तर त्वरित सावध व्हा…अन्यथा अनेक गंभीर परिणामांना तोड द्यावे लागेल

दूध पिण्याचे तोटे… जर आपण या पद्धतीने आणि यावेळेला दूध पीत असाल तर त्वरित सावध व्हा…अन्यथा अनेक गंभीर परिणामांना तोड द्यावे लागेल

खाण्या-पिण्याच्या पदार्थांचं सेवन वेळी-अवेळी केल्यास आपल्याला आजारांची लागण होण्याची शक्यता जास्त असते. निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक जण शक्य होईल तितकी सर्वतोपरी काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतो. खूप कमी खर्चातही तुम्ही तुमचे फिटनेस राखू शकता.

नियमित दूध प्यायल्यानंही आपल्या शरीराला प्रचंड प्रमाणात पोषकतत्त्वांचा पुरवठा होतो. दूध केवळ लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

आयुर्वेदामध्ये दुधाला संपूर्ण आहाराचा दर्जा देण्यात आला आहे. आयुर्वेदानुसार आपलं शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेलं आहे. यानुसार जर तुम्ही वेळी-अवेळी कोणत्याही अन्नपदार्थांचं सेवन केलं तर या तत्त्वांचं संतुलन बिघडतं आणि आपल्याला आजारांची लागण होते.

बहुतांश लोक दुधाचं नियमित स्वरुपात सेवन करतात. पण दूध पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहिती आहे का? आयुर्वेदानुसार दूध कोणत्या वेळेस प्यावे, हे जाणून घेऊया.

​दूध पिण्याची योग्य वेळ:-

दुधाचे सेवन सकाळी नाश्त्यामध्ये केले जाऊ शकते. पण यावेळेस नाश्त्यामध्ये मिठाचा समावेश असलेल्या अन्य कोणत्याही अन्नपदार्थांचा सेवन करू नये. दुधासोबत कधीही मीठयुक्त पदार्थ खाणे टाळावे.

तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळेस दुधाचे सेवन करू शकता. पण दूध पिण्यापूर्वी तसंच प्यायल्यानंतर लगचेच कोणतेही खारट किंवा मीठ असलेले पदार्थ खाऊ नये.

नॅशनल डेअरी काउंसिलनुसार, आपल्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी आवश्यक असलेल्या पौष्टिक घटकांचा दुधामध्ये समावेश आहे. आपल्या शरीराला एकूण नऊ पौष्टिक घटक दुधाद्वारे मिळतात.

​जेवणानंतर किती वेळानं दूध प्यावं:-

रात्रीचे जेवण केल्यानंतरही तुम्ही दुधाचे सेवन करू शकता. पण रात्री जेवण आणि दूध पिण्याच्या वेळेमध्ये तुम्हाला किमान दोन तासांचे अंतर ठेवावे लागेल. तेव्हाच तुमच्या शरीराला संपूर्ण लाभ मिळू शकतील.

जेवणानंतर लगेचच दूध प्यायल्यास फूड पॉयजनिंग, गॅस, अपचन, उलटी होणे, पोट दुखणे, जुलाब यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. कारण दूध आणि तेल तसंच मीठ युक्त जेवण दोन्ही परस्पर विरोधी प्रकृतीचे आहेत.

काहींना सकाळचा हेल्दी नाश्ता आणि त्यासोबत पोषक घटकांनी भरपूर असे दूध पिल्याने पचण्यासाठी अडचण येऊ शकते. कारण हे एक हेवी भोजन ठरू शकतं. यामुळे पोटदुखीचा त्रासही होऊ शकतो. याशिवाय सकाळी दूध पिणं स्किनसाठी चांगलं नाही. त्यामुळे सकाळी दूध पिणं टाळलेलंही चांगलं ठरू शकतं.

रात्री दूध पिणार असाल तर उपाशी पोटी पिऊ नका. यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते. लॅक्टोजच्या अॅलर्जीमुळे काहींना पोटदुखीची समस्याही होऊ शकते. रात्री दूध पिल्याने शरीरात इन्सुलिनची पातळी वाढते.

दुधापासून काही प्रमुख नुकसान खालील प्रमाणे

१.लहान मुलांना भेसळयुक्त दूध पाजल्यामुळे त्यापासून त्यांच्या स्वास्थावर विपरीत परिणाम होतात. दूध पावडर पासून बनलेले दूध हे कॅन्सर साठी कारणीभूत ठरू शकते.

२.अध्ययनातून हे समजले आहे कि, दुध हे हाडांमधील कॅल्शियम शोषून घेतो यावर मात्र अजून शोध चालू आहे. त्यामुळे याबाबत पूर्ण सत्यता मानता येत नाही.

3.काही मुलांमध्ये दुधात सापडणारे केंसीइन प्रोटीन सहन होत नाही त्यामुळे ह्यापासून अनेक आजार होण्याची भीती असते.

४.काही मुलांमध्ये मधुमेहाला सहाय्यक म्हणून दूध घातक ठरू शकते त्यामुळे अशावेळी दुधाचे सेवन विपरीत परिणामकारक ठरते.

५.दुधात अनेक प्रकारचे प्रोटीन्स असतात त्यापैकी केंसीइन प्रोटीन हृदयाशी संबंधित आजारांना आमंत्रण देतो. त्यामुळे दुधाचे सेवन हानिकारक ठरते.

Health Info