मधुमेह असलेल्या रुग्णांनी करावे या एका पदार्थाचे सेवन…मिळू शकतात अनेक फायदे…फक्त याप्रकारे करा या पदार्थांचे सेवन

मधुमेह असलेल्या रुग्णांनी करावे या एका पदार्थाचे सेवन…मिळू शकतात अनेक फायदे…फक्त याप्रकारे करा या पदार्थांचे सेवन

मधुमेह आपल्या देशाची वाढती समस्या आहे. या जगात मधुमेहींच्या गणनेमध्ये आपला दुसरा नंबर येतो. प्रत्येक पाचव्या भारतीय नागरिकाला मधुमेह असून ही फार काळजीची बाब आहे.

मधुमेहाची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याची काही लक्षणे नसतात. उदा. जेव्हा आपल्याला संसर्ग झाला की ताप येतो, पोट बिघडले की मग पोट दुखते- पण मधुमेहात मात्र असे काहीही होत नाही. मधुमेहाची जी लक्षणे आहेत-

खूप भूक लागणे, खूप तहान लागणे, खूप लघवी होणे, ही रक्तातील साखर फार जास्त प्रमाणात वाढल्यावरची लक्षणे आहेत. पण रक्तातील साखर हळूहळू जास्त होते.मधुमेह  झाल्यावर त्याचे पथ्यपाणी व इलाज करण्यापेक्षा तो टाळता यावा यावर भर दिला पाहिजे.

मधुमेहाचे रुग्ण 5 ग्रॅम संपूर्ण धणे एका ग्लास पाण्यात भिजतात. दुसर्‍या दिवशी धणे काढून पाण्याचे सेवन केल्यास त्याचा फायदा होईल. जर आपण धणे बियाणे वापरत असाल तर ते रक्तातील साखर सहजपणे नियंत्रित करू शकते.

लिंबू, आवळा, कोकम सरबत साखरेऐवजी स्वीटनर वापरून घेता येतील. शहाळ्याचं पाणी, अधमुऱ्या दह्याचं ताक, दूध, ताज्या फळांचा रस, व्हेज क्‍लीअर सुप्स, कडधान्यांचं कढण, वरणाचं पाणी, क्‍लीअर चिकन सूप, भाताची पेज, कांजी, नाचणी किंवा ज्वारीच्या पिठाची आंबील, स्वीटनर वापरुन केलेल्या पातळसर खिरी, मुगाच्या डाळीची पातळसर खिचडी असं काही न काही थोड्या थोड्या वेळानं घ्यावं.

उलट्या किंवा जुलाब होत असल्यास, रक्तशर्करा एकदम कमी होऊ शकते. अशावेळी आहारात थोडी साखर वापरावी. डीहायड्रेशन होऊ नये म्हणून दिवसभरात कमीतकमी – ग्लास पाणी आणि इतर पातळ पदार्थ घ्यावेत.

हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, मोड आलेली कडधान्ये, नाचणा, कमी पॉलीश केलेला तांदूळ, दूध इ. चा आहारात समावेश करावा.
हिरव्या पालेभाज्या, जास्त गोड नसणारी विविध फळे खावीत कारण त्यामध्ये तंतूमय घटकांचे प्रमाण अधिक असते.
तंतुमय पदार्थ (फायबर्सयुक्त पदार्थ) मधुमेहींमध्ये अत्यंत उपयोगी असतात. यांमुळे रक्तातील साखर नियंत्रीत तर होतेच शिवाय रुग्णांमधील हृद्यविकाराचा धोकाही कमी होण्यास तंतुमय पदार्थांमुळे मदत होते.

सफरचंद, स्ट्रोबेरी, जांभूळ, आवळा, संत्री, मोसंबी, डाळिंब, कलिंगड ही फळे खाऊ शकता. फळभाज्यामध्ये गवार, कारले, भेंडी, दुधी भोपळा, बीट यांचा समावेश करावा. आहारात मूग, मटकी, उडीद, चवळी यासारखी कडधान्ये समाविष्ट करावीत. पुरेसे पाणीही प्यावे. दिवसातून किमान आठ ग्लास पाणी प्यावे.

मधुमेही व्यक्तींनी काय खाऊ नये:-
गूळ किंवा साखर (अगदी मध सुद्धा) घातलेले सर्व पदार्थ बंद कोकाकोला, पेप्सी, मिरिंडा, मॅंगोला, लिम्का यांसारखे सर्व कोल्ड्रिंक्स बंद करा.तळलेले सर्व पदार्थ बंद करा.सर्व बेक केलेले पदार्थ बंद करा.

साबुदाणा, मैदा,रवा, खवा (मावा) यांपासून बनविलेले सर्व पदार्थ बंदपांढरा भात, बटाटा, रताळे कमी प्रमाणात कमी वेळा खा. पिकलेले आंबे, चिकू, केळी अतिशय कमी प्रमाणात खा किंवा अजिबात खाऊ नका.

Health Info Team