का उघडला जात नाही केरळच्या पद्मनाभ मंदिराचा सातवा दरवाजा…यामागील सत्य जाणून आपण सुद्धा थरथर कापाल…पण जर दरवाजा उघडलाच तर मग…

का उघडला जात नाही केरळच्या पद्मनाभ मंदिराचा सातवा दरवाजा…यामागील सत्य जाणून आपण सुद्धा थरथर कापाल…पण जर दरवाजा उघडलाच तर मग…

आपल्या भारत देशात अनेक अद्भूत, चमत्कारिक, रहस्यमय, थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. भारतीय संस्कृती आणि प्राचीन परंपरा जपणारी मंदिरे यात सर्वांत आघाडीवर आहेत. जगातील श्रीमंत मंदिरांपैकी वरचा क्रमांक लागणाऱ्या तिरुवनंतपूरम येथील पद्मनाभ मंदिरातही अनेक गूढ रहस्ये दडली असल्याचे सांगितले जाते.

काही वर्षांपूर्वी पद्मनाभ मंदिराच्या तळघरातील सहा दरवाजे खुले करण्यात आले होते. मात्र, सातवा दरवाजा खुला करण्यात आला नाही. यामागे अनेक गूढ, रहस्ये आणि जोखीम असल्याचे सांगितले जाते. करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सध्या हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

पद्मनाभ मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने पद्मनाभ मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्रावणकोरच्या राजपरिवाराकडे असल्याचे मान्य केले आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार,

या मंदिराच्या तळघरात असलेले दरवाजे खुले करण्यात आले होते. तळघरातील दरवाजे खुले केल्यावर संपूर्ण जगाने तोंडात बोटे घातली. मात्र, सातवा दरवाजा खुला करण्यात आला नाही. पद्मनाभ मंदिराच्या तळघरातील सातव्या दरवाज्यामागे नेमके काय दडलंय? जाणून घ्या…

श्रीविष्णूंना समर्पित असलेले श्रीपद्मनाभस्वामी मंदिर त्रावणकोरच्या राजांनी ६ व्या शतकार उभारले होते. पद्मनाभ मंदिराचा उल्लेख ९ व्या शतकांतील काही ग्रथांमध्ये आढळतो. त्रावणकोर घराण्याने आपले जीवन, संपत्ती आणि सर्वस्व पद्मनाभ मंदिराला अर्पण केले होते.

सन १७५० मध्ये महाराज मार्तंड वर्मा यांनी या मंदिरावर आपला हक्क सांगितला. तेव्हापासून राजघराण्यातील सदस्य या मंदिराचे व्यवस्थापन पाहतात. या मंदिराचा एक कणही स्वतःसाठी घेत नाहीत. या मंदिरातून बाहेर पडताना आजही ते पाय धुऊन बाहेर पडतात. जेणेकरून मंदिराच्या मातीचे कणही चुकून त्यांच्यासोबत जाऊ नयेत.

काही वर्षांपूर्वी पद्मनाभ मंदिराच्या तळघराचे सहा दरवाजे खुले करण्यात आले होते. या तळघरात तब्बल एक लाख ३२ हजार कोटींची संपत्ती मिळाली होती. यात श्रीविष्णूंची साडेतीन फूट लांबीची सोन्याची मूर्ती मिळाली होती. श्रीविष्णूंना अनेक प्रकारची रत्ने, हिरे अर्पण करण्यात आले होती.

याशिवाय १८ फूट लांबीची सोनसाखळी मिळाली होती. तसेच मोठ्या प्रमाणात हिरे, किमती रत्नांचे भंडार यात सापडले होते. सहा दरवाजे खुले करण्यात आल्यानंतर सातव्या दरवाजापाशी पोहोचल्यावर मात्र अचंबित करणारी गूढ रहस्ये आणि मान्यता समोर आल्या.

त्रावणकोरच्या राजांनी अत्युच्च दर्जाची अपार संपत्ती या तळघरात ठेवल्याची मान्यता आहे. या तळघरातील वॉल्ट बी म्हणजेच सातवा दरवाजा खुला करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा दोन जणांचा सर्पदशांने मृत्यू झाला. सातवा दरवाजा खुला केल्यास अनेक अशुभ घटना घडतील,

अशी मान्यता आहे. गेली हजारो वर्षे या मंदिराच्या तळघरातील कोणताही दरवाजा कधीही खुला करण्यात आला नव्हता. त्यामुळे गेली अनेक वर्षे तळघरातील काही भाग हा शापित मानला गेला आहे. तळघरातील सातव्या भागाचे संरक्षण दोन सर्पराज करतात, अशी मान्यता आहे.

पद्मनाभ मंदिराच्या तळघरातील सातवा दरवाजा स्टीलचा आहे. या दरवाजाला कुठलीही कडी किंवा कुलूप नाही. या दरवाजावर दोन सापांच्या आकृती रेखाटण्यात आल्या आहेत. सातव्या दरवाजापर्यंत पोहोचल्यानंतर दरवाजावरील सर्पचित्र पाहून पुढील काम थांबवण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयानेही श्रद्धेचा आणि मान्यतांचा आदर करत दरवाजा खुला करण्याबाबतचे सर्वाधिकार मंदिर कमिटीला दिले. हा दरवाजा बंद करताना नाग पाशम मंत्राचा प्रयोग करण्यात आला होता, अशी मान्यता आहे. काही जणांच्या मते, या दरवाजापाशी कान लावल्यास समुद्राच्या लाटांचा आवाज येतो. हा दरवाजा खुला केल्यास प्रलय येऊन सर्व जलमय होईल, असा दावा केला जातो.

पद्मनाभ स्वामी मंदिराच्या तळघरातील सातवा दरवाजा खुला करण्यासाठी गरुड मंत्राचे अचूक आणि स्पष्ट उच्चारण होणे आवश्यक असल्याची मान्यता आहे. असा एकही सिद्ध पुरुष सापडलेला नाही, जो गरुड मंत्राचे अचूक आणि स्पष्ट उच्चारण करेल.

गरुड मंत्र म्हणताना चूक झाली, तर त्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित असल्याचीही मान्यता आहे. या सातव्या दरवाजामागे दोन लाख कोटींपेक्षा अधिकची संपत्ती दडली असल्याचा दावा केला जात आहे. काही इतिहासकारांच्या मते दावा करण्यात येत असलेल्या संपत्तीचा आकडा छोटा आहे.

Health Info Team