देव तारी त्याला कोण मारी..भारतीताईंना आला स्वामी श्रद्धा आणि विश्वासाचा एक विलक्षण अनुभव..

देव तारी त्याला कोण मारी..भारतीताईंना आला स्वामी श्रद्धा आणि विश्वासाचा एक विलक्षण अनुभव..

नमस्कार मित्रांनो..Update Express या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनुभवाच्या लेखमालेमध्ये तुमचे स्वागत आहे. स्वामींच्या भक्तीची ताकत संपूर्ण जगाला कळावी हे आपले ध्येय आणि आज जगभरामधल्या अनेक देशांमध्ये आपले लेख वाचले जात आहेत. स्वामींच्या सेवेकर्‍यांचे अनुभव लिहण्याचे सौभाग्य मिळाले हे चित्ती समाधान. तुम्ही देखील तुमचे अनुभव पेजला मेसेज करून सांगू शकता. यापुढील लेख हा स्वामींच्या सेवेकर्‍याच्या शब्दामध्ये.

मी भारती, राहाणार मुंबई. अनेक वर्षापूर्वी आमच्या आजीकडे एक बटवा असायचा. माझ्या आजीच्या या छोट्याश्या पिशवीमध्ये अनेक लहान मोठ्या आजारांवर रामबाण उपाय सापडायचे. आज आजीचे हे बटवे राहिले नाहीत पण स्वामी समर्थांच्या केंद्रामुळे अनेक अशा छोट्या छोट्या गोष्टी सेवेकर्‍यापर्यन्त पोचतात ज्याचा उपयोगाने अनेक आजारांवर उपाय केला जाऊ शकतो. मित्रांनो आज मी मला आलेल्या स्वामी महाराजांच्या अनुभवाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे.

दिवस होता 5 जानेवारी 2021 चा, त्या दिवशी का कुणास ठाऊक माझी भाची गौरी खूप तापली होती. तुम्हाला सांगायला विसरले पण आमची परिस्थिती खूप हलाखीची आहे, आणि त्यावेळी तर आमच्या घरात पैसे असे नवतेच. गौरीला घरामध्येच एक जुने औषध मी दिले, पण त्या औषधाचा गुण काही येईना. रात्री बारा नंतर तर तिच्या अंगामधला ताप वाढला, तिच्या अंगाचे अक्षरश: चटके बसत होते. बारा वर्षाचे ते लेकरू तापाने फनफनत होते.

आमच्या यांनी काही मित्रांना फोन करून उसनवारीवर काही पैसे आणले. आम्ही दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळीच तिला दवाखान्यात घेऊन गेलो. संपूर्ण शहरामध्ये कोरोंना होताच… आणि आमच्या दुर्दैवाने गौरीला देखील कोरोंना झाला होता. एखाद्या खाजगी दवाखान्यात उपाय करण्याची कुवतच नवती. नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये उपचार सुरू झाले. गौरीचा ताप काही उतरत नवता, ती डोळे उघडत नवती आणि काळपासून ती एक शब्दही बोलली नवती. स्वामी महाराज माझ्या गौरीला काहीही होऊ देणार नाहीत याची मला खात्री होती, आणि सगळे त्यांच्यावर मी सोपवले होते.

यममी आणलेले दीड हजार घेऊन मग आम्ही तिला प्रायव्हेट हाॅस्पीटलमध्ये नेल. त्या डाॅक्टरांनी काही औषघे गौरीसाठी लिहून दिली. दुपार झाली होती, औषधे देऊन वेळ देखील झाला होता पण ताप काही कमी व्हायचे नाव घेत नवता. आता माझी धाकधूक वाढायला लागली, स्वामींवरचा

माझा विश्वास डळमळीत व्हायला लागला.. महाराज माझी परीक्षा तर घेत नवते ना ? माझा स्वामींचा धावा चालूच होता, मला अशात आठवले की स्वामींच्या ग्रुपवर अनेकदा ललिता सहत्रनाम श्रोत्र टाकले गेले होते. मी फोन उचलला आणि तिच्या डोक्यावर हात ठेऊन श्रोत्र म्हटले आणि तिच्या नाडीवर गौरीची आई आणि मी वल्गासूक्त केले.

एखदा तास झाला नसेल पन गौरीला घाम सुटायला लागला होता, आता तिचा ताप उतरला होता आणि तिने डोळे देखील उघडले. काही वेळाने ती बेडवर उठून बसली. स्वामींनी तिला बारे केले होते, आम्ही तिला देखील स्वामींची सेवा करायला संगितले. त्या गुणी लेकराने 21 वेळा स्वामींचा जप केला. मित्रांनो खूप मोठा चमत्कार झाला होता, डॉक्टर म्हणाले होते की सलग पाच दिवस ताप येईल पण गौरीला त्यानंतर ताप काही आला नाही. डॉक्टरांनी औषध तर दिले होते पण स्वामींनी उपचार केले होते. श्री स्वामी समर्थ !!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज Update Express लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

Health Info Team