मूत खडा असताना ‘या’ पदार्थांचं सेवन पडू शकतं महागात…बघा मूत खडा असणाऱ्या लोकांनी कोणत्या पदार्थाचे सेवन करावे आणि कोणत्या नाही

बदलती लाइफस्टाइल, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे अनेकांना किडनी स्टोनसारख्या वेदनादायी समस्येचा सामना करावा लागत आहे. पण याबाबत असलेल्या अनेक गैरसमजामुळे यावर नेमका उपाय करणं अनेकांना कठिण होऊन बसतं. किडनी स्टोन असताना काय खावे काय खाऊ नये अशा अनेक महत्वाच्या गोष्टी लोकांना माहीत नसतात. आणि या गोष्टी माहीत नसल्याने अनेकांची ही समस्या अधिक वाढते.
किडनी स्टोन होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. पण जास्तीत जास्त ही समस्या खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयींमुळे होते. मीठ आणि शरीरातील इतर खनिज जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा किडनी स्टोन होतो. याचा काही ठरलेला आकार नसतो. कधीकधी हे स्टोन लघवीच्या माध्यमातून बाहेत पडतात पण कधी कधी यामुळे होणाऱ्या वेदना सहस्य होतात.
मूत खडा असणाऱ्या लोकांनी काय खाऊ नये-
कोल्ड्रिंक आणि कॅफिनचे सेवन करू नये:-
कॅफिन हे डिहायड्रेशनचे देखील एक कारण आहे, म्हणून मुतखडा असल्यास जास्त चहा आणि कॉफी पिणे थांबवावे. तसेच कोल्ड्रिंक देखील पिणे टाळावे. त्यामध्ये असलेले फॉस्फोरिक एसिडमुळे अधिक मुतखडा होण्याची शक्यता असते.
मांसाहार टाळा:-
काही पदार्थांमध्ये किडनी स्टोन तयार करणारे यूरिक असिड आणि प्यूरिनसारखे तत्त्व असतात. त्यामुळे किडनी स्टोन असताना मांस, मासे, वांगी, मशरुम, फ्लॉवर खाऊ नये. तसेच कोल्ड ड्रिंक्स, मांस, मासे खाऊ नये. फळांमध्ये स्ट्रॉबेरी, बोरं, अंजीर, किशमिश हे खाऊ नये. तसेच दूध आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ जसे की, दही, पनीर, टॉफी, कॅन सूप, नूडल्स, तळलेले पदार्थ, जंक फूड, चिप्स आणि चहाचं जास्त सेवन करु नये.
मीठाचे सेवन कमी करा:-
मुतखडा झाल्यास आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे. विशेषतः पापड, लोणची, वेफर्स यासारखे खारट पदार्थ खाणे टाळावे. लघवीत मिठाचे (सोडिअमचे) प्रमाण अधिक असल्यास कॅल्शियमचे मुतखडे होण्याची शक्यता जास्त वाढते. त्यामुळे मुतखड्याचा त्रास असल्यास मिठाचे प्रमाण कमी करावे.
व्हिटॅमिन सी आणि ऑक्सलेट पदार्थापासून दूर रहा:-
अशा पदार्थाचे सेवन करणे टाळा, ज्यात ऑक्सलेट आणि व्हिटॅमिन-सी असतात. काही पदार्थांमध्ये ऑक्सलेट असतं जे किडनी स्टोन वाढण्यास कारणीभूत ठरतं. त्यात टोमॅटो, पालक, चवळी, द्राक्ष, सोयाबीन, सोया मिल्क, चीकू, काजू, चॉकलेट, उडीद, चणे, शेंगदाणे या पदार्थांचा समावेश आहे
या पदार्थांना नाही म्हणा:-
कि़डनी स्टोन झाला असताना कोल्ड ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक अजिबात सेवन करु नये. कारण हे तयार करण्यासाठी फॉस्फोरिक अॅसिडचा वापर होतो. त्यामुळे किडनी स्टोन असताना यांचं सेवन टाळावे. तसेच कॅल्शिअम कमी प्रमाणात घेतलेलं बरं होईल. कारण कॅल्शिअम आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं आहे. पण किडनी स्टोन असताना जास्त कॅल्शिअममुळे समस्या वाढू शकते. त्यामुळे कमी प्रमाणात कॅल्शिअम घ्यावं.
द्रव पदार्थ घ्या:-
आहारात द्रव मूत्रल आहार जास्त असावा. यामध्ये भूक वाढेल, पोट साफ राहील, गॅसेस उत्पन्न होणार नाहीत असा आहार घ्यावा म्हणजे त्रास कमी होईल. यात कोथिंबीर, धने, जिरे, कोबीची भाजी, शेवग्याच्या शेंगांची भाजी तसेच पानांची भाजी, काळे मनुके, तुळशीचे बी आदी प्रकार घ्यावेत.
हरभरा डाळ, नुसते शेंगदाणे, तोंडली, वांगी, टोमॅटो, अंजीर, काजू, अळू, मेथीची भाजी, बाजरी, पनीर, मासे, खेकडा आदी क्षारयुक्त व आपधातू दृष्ट करणारे पदार्थ टाळावेत.
लिंबूवर्गीय:-
लिंबूवर्गीय फळे आणि त्यांचे रस नैसर्गिकरित्या मुतखडा कमी करण्यास किंवा प्रतिबंधित करण्यास मदत करतात. लिंबू, संत्री आणि द्राक्षे लिंबूवर्गाचे चांगले स्रोत आहेत. विशेषत: संत्र्याचा रस, हंगामी रस, ताजा लिंबाचा रस, ताज्या फळांचा रस.
तुळशीची पाने खा:-
तुळशीच्या पानांमध्ये असे काही घटक आहेत जे यूरिक एसिडची पातळी स्थिर करण्यास सक्षम आहेत, ज्यामुळे मूत्रपिंडात दगड तयार होऊ शकत नाहीत. तुळशीच्या पानांमध्ये आढळणारा एसिटिक एसिड मूत्रपिंडाचा दगड वितळण्यास आणि काढून टाकण्यास मदत करतो. रोज एक चमचा तुळशीचा रस पिल्याने मूत्रपिंडातील दगड दूर होण्यास मदत होते.
जर का मूतखड्याचे निदान लवकर झाले व रुग्णाने तत्काळ आयुर्वेदिय औषधांचा व पथ्यांचा अवलंब घेतला तर मूतखडा निश्चितच त्रास न देता शरीरातून बाहेर फेकला जाऊ शकतो व ‘पाषाणवृक्क’ असलेली व्यक्ती आरोग्यपूर्ण आयुष्य जगू शकते.