महिन्यातून फक्त एकदा करा या फळाचे सेवन…आपले कोणतेही रोग आणि आजार काही दिवसांत होतील नाहीसे…याप्रकारे करा या फळाचे सेवन

महिन्यातून फक्त एकदा करा या फळाचे सेवन…आपले कोणतेही रोग आणि आजार काही दिवसांत होतील नाहीसे…याप्रकारे करा या फळाचे सेवन

सिताफळ हे एक सिझनल फळ आहे. सध्या बाजारात सिताफळं मिळायला सुरूवात झाली आहे. वास्तविक प्रक्रिया करून तुम्ही सिताफळ अगदी वर्षाचे बाराही महिने टिकवून ठेवू शकता. पण जे फळ ज्या हंगामात पिकतं ते त्याच सिझनमध्ये खाण्यात एक वेगळीच मौज असते. हंगामी काळात ते फळ अगदी ताज्या स्वरूपात मिळत असल्यामुळे त्याचे चांगले फायदे आरोग्यावर होत असतात.

सिताफळ हे अतिशय उपयुक्त असं फळ आहे. सिताफळ खाण्यासाठी जितकं स्वादिष्ट लागतं तितकंच ते तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. सिताफळ हे पित्तानाशक, पौष्टिक, रक्तवर्धक, वातदोष कमी करणारं असं फळ आहे. काही जणांना पिकलेल्या सिताफळाचा गर खायला आवडतो तर काहीजणांना त्याच्यापासून तयार केलेलं मिल्कशेक आणि बासुंदी.

कशाही स्वरूपात खाल्लं तरी सिताफळाचे फायदे शरीरावर नक्कीच मिळू शकतात. फक्त सिताफळ हे एक गोड चवीचं  फळ असल्याने ते मधुमेहींनी अती प्रमाणात खाऊ नये. यासाठीच जाणून घ्या सिताफळाचे आरोग्यावर काय परिणाम होतात.

आजकालच्या दगदगीच्या जीवनशैलीमुळे ह्रदयावरील ताण दिवसेंदिवस वाढत चालता आहे. काम आणि चिंता यामुळे ह्रदयाचे आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक असते.

ह्रदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ह्रदयातील मांसपेशींना मॅग्नेशियमची गरज असते. सिताफळात भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते. ज्यामुळे ह्रदयविकारापासून दूर राहण्यासाठी सिताफळ खाणं तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

सिताफळ हे नैसर्गिक अॅंटिऑक्सिडंट आहे. यातील व्हिटॅमिन सीमुळे तुमच्या शरीरातील दाह कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

नियमित एक सिताफळ खाण्यामुळे तुम्ही आजारपणापासून दूर राहू शकता. सिताफळामुळे फ्री रेडीकल्सपासून तुमचे संरक्षण होते आणि तुम्ही निरोगी राहता.

सिताफळातील काही पोषकघटकांमुळे तुमचे दृष्टीदोषदेखील कमी होऊ शकतात. सिताफळात व्हिटॅमिन सी असतं. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या अथवा दृष्टीबाबत असलेल्या समस्या कमी होतात आणि तुमची दृष्टी तेज होते.

पाचक प्रणाली सुधारते:-
आजकाल पाचन तंत्राशी संबंधित समस्या असणे खूप सामान्य आहे. पाचक प्रणाली योग्य ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारात फायबरचे प्रमाण वाढवणे खूप महत्वाचे आहे.मध्यम आकाराच्या सीताफळमध्ये सुमारे 5 ग्रॅम आहारातील फायबर असते जेणेकरून आपल्या पोटातील सर्व समस्या दूर होतील, म्हणून दररोज सीताफळ खा.

तसेच सिताफळाच्या बियांच्या तेलाने मालिश केल्यामुळे तुमचे केस मऊ आणि मुलायम होतात. आजकाल सततच्या प्रदूषणाचा परिणाम नकळत तुमच्या केसांवर होतो. ज्यामुळे ते निस्तेज आणि कोरडे दिसू लागतात. यासाठीच केसांवर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर केसांना सिताफळाच्या बियांचे तेल लावा. ज्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं.

आजकाल कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. यावर उपाय म्हणून रोजच्या आहारात सिताफळाचा समावेश जरूर करा. कारण सिताफळामध्ये कर्करोगावर मात करण्याचे सामर्थ्य आहे.विविध प्रकारच्या कर्करोगावर मात करण्यासाठी सिताफळ हे एक आयुर्वेदिक औषध म्हणून वापरण्यात येत आहे. सिताफळातील पोषक घटक कर्करोगापासून तुमचा बचाव करतात.

सिताफळ हे फक्त एक चविष्ठ फळ नसून एक उत्तम सौंदर्यप्रसाधनदेखील आहे. सिताफळात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, अॅंटिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि नितळ दिसू लागते. यासाठी दररोज नास्त्याला अथवा मधल्यावेळी एक सिताफळ खा.

सिताफळाच्या आतील गराची पेस्ट तुम्ही तुमच्या तोंडातील अल्सर, फोड यावरदेखील लावू शकता. कारण सिताफळात व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे तुमच्या जखमा लवकर बऱ्या होतात.एखादी जखम अथवा इनफेक्शन बरं करण्यासाठी तुम्ही मलमासारखा सिताफळाच्या गराचा वापर करू शकता. शिवाय याचा कोणताही साईड इफेक्ट नक्कीच होत नाही.

Health Info Team