जर अचानक आपले ब्लड प्रेशर कमी झाले …तर त्वरित करा या गोष्टी अन्यथा आपल्याला मृत्यूला तोंड द्यावे लागेल.

आपल्यासाठी उच्च रक्तदाबच केवळ धोकादायक नाही तर कमी रक्तदाब देखील आपल्याला खूप धोकादायक आहे. अचानक रक्तदाब कमी झाल्याने चक्कर येणे, हात पाय थरथरणे, खूप घाम येणे अशा गोष्टी आपल्या सोबत घडतात. त्यामुळे अचानक बीपी कमी होण्याच्या समस्येमुळे बरेच लोक खूप अस्वस्थ असतात.
पण आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहोत की जेव्हा रक्तदाब कमी होतो तेव्हा आपण कोणत्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे. जर आपला अचानक रक्तदाब कमी झाला तर या गोष्टींचे सेवन केल्यास आपल्याला त्वरित आराम मिळू शकेल. तर चला मग जाणून घेऊ की
आपल्याला कदाचित माहित नसेल पण मिठाचं जास्त सेवन केल्याने उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. परंतु हेच मीठ आश्चर्यकारकरित्या कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांना लाभदायी ठरू शकते. एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस आणि एक दोन चिमुटभर मीठ त्यात मिसळून दिवसातून किमान तीन वेळा त्याचे सेवन करावे.
हा उपाय केल्यास कमी रक्तदाबामुळे निर्माण झालेली आपली शारीरिक स्थिती पूर्ववत होण्यास आपल्याला मोठी मदत मिळते. त्यामुळे कधी रक्तदाबाचा अधिक त्रास झाल्यास आपण आवर्जून हा उपाय करून पहा आणि आपला रक्तदाब पूर्ववत करा.
सामान्यत: कमी रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रूग्णांनी स्वत:जवळ नेहमी कॉफी व चॉकलेट बाळगावे. असं म्हणतात की कॉफी व चॉकलेटमध्ये असलेली कॅफिनची मात्रा कमी रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींची स्थिती सुधारण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
म्हणून ज्या लोकांना वारंवार कमी रक्तदाबाचा त्रास होतो त्यांनी स्वत: सोबत नेहमी कॉफी व चॉकलेट ठेवावे. जेणेकरून कमी रक्तदाबाची समस्या निर्माण झाल्यास ते खाऊन आपली स्थिती नियंत्रणात आणता येईल. हा सल्ला आपण आपल्या ओळखीच्या लोकांनाही आवर्जून द्या ज्यांना कमी रक्तदाबाची समस्या आहे.
स्नॅक्सचे सेवन:-
खारट गोष्टी घेतल्यानंतर आपली रक्तदाब पातळी देखील सामान्य होऊ शकते. जेव्हा अचानक रक्तदाब कमी होतो तेव्हा आपण अति खारट पदार्थ देखील घेऊ शकता.
कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांनी आहारात या गोष्टीचा समावेश करावा:-
कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांनी खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी. कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांनी आहारात लोहयुक्त वस्तूंचा समावेश केला पाहिजे. कमी रक्तदाब रुग्णांनी आपल्या आहारात या गोष्टीचा समावेश केला पाहिजे- -केळी–फॉक्स नट-पपई-मुळा-पालक
वजन कमी करणे :
आपली शारीरिक वाढ पूर्ण झाल्यावर जे आपले वजन वाढते ते मुख्यत्वे चरबीच्या स्वरूपात वाढलेले असते. हे वजन आपण कमी केल्यास आपल्या आरोग्यावर खूप चांगले परिणाम होतात.
वजन कमी केल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी खूप मोठी मदत होते, म्हणून डॉक्टर आपल्याला वजन कमी करण्याचा सल्ला देतात. आहारामध्ये आपण पुरेसे बदल केले तर वजन कमी करणे सोपे होते.
प्रक्रिया केलेले पदार्थ हे आपल्या आरोग्यासाठी खूप वाईट असतात. त्यामध्ये उष्मांक म्हणजेच कॅलरी यांचे प्रमाण खूप जास्त असते. शिवाय, अशा पदार्थांमध्ये लपलेले मीठ आणि लपलेले साखर यांचे प्रमाणसुद्धा खूप जास्त असते. हे पदार्थ टाळल्याने वजन कमी व्हायला मदत तर होतेच, शिवाय रक्तदाब कमी होण्यासाठीसुद्धा मदत होते.