अशक्तपणा, थकवा, कमकुवत डोळे, साखर, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, पोटाचे आजार कोणतीही समस्या असो…फक्त जेष्ठमधापासून करा हे उपाय

अशक्तपणा, थकवा, कमकुवत डोळे, साखर, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, पोटाचे आजार कोणतीही समस्या असो…फक्त जेष्ठमधापासून करा हे उपाय

ज्येष्ठमध हे अत्यंत गुणकारी औषध असून महिलांसाठी वरदान आहे. ज्येष्ठमधाचे फायदे अनेक आहेत. तुम्ही ज्येष्ठमध पावडर वापरू शकता. ज्येष्ठमध खाण्याचे फायदे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. केवळ शारीरिक नाही तर ज्येष्ठमधाचे तुमच्या त्वचेसाठीही फायदे होतात.

ज्येष्ठमध असो वा ज्येष्ठमध पावडर फायदे दोन्हीचे आहेत. आपण नक्की आपल्यासाठी याचे काय आणि कसे फायदे होतात ते बघणार आहोत. पण त्याआधी ज्येष्ठमधाच्या किती पद्धती आहेत आणि ज्येष्ठमध म्हणजे नक्की काय ते जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

कारण बऱ्याच जणांना ज्येष्ठमध म्हणजे नक्की काय आणि त्याचा फायदा कसा करून घेता येतो याची माहिती नाही. ज्येष्ठमध हे हिंदीमध्ये मुलेठी या नावाने ओळखले जाते. बऱ्याच ठिकाणी याची ओळख याच नावाने आहे. बघूया मग नक्की काय आहेत याचे फायदे.

मानसिक बुद्धीसाठी:-

शरीरासह मनही आजारी असू शकतं. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली बुद्धी कोणता विचार करतेय हे आहे. पण तुम्ही ज्येष्ठमध चूर्ण नियमित दुधाबरोबर सेवन केलं तर तुम्हाला मनःशांती मिळण्यास मदत मिळते. हे अतिशय शांत औषधी असून तुम्हाला शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी आणि आपसुकच त्यामुळे मनावरही थंडावा निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरते.

त्वचा चमकदार करण्यासाठी:-

चमकदार त्वचा कोणाला नको असते? प्रत्येकालाच आपली त्वचा नेहमी चमकदार आणि ताजीतवानी दिसावी असे वाटत असते. त्यासाठी आपण ज्येष्ठमधाचा वापर करून घेऊ शकतो. यष्टीमधू आणि ज्येष्ठमधाची पावडर एकत्र करून याचा लेप आपण चेहऱ्याला लावला आणि त्याचा नियमित वापर केला तर आपल्या चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होते. तसेच चेहरा उजळून अधिक चमकदार होतो. यामुळे त्वचा गुलाबी होते आणि मुलायमदेखील होते.

डोळ्यांसाठी टॉनिक:-

आपली दृष्टी चांगली राहावी यासाठी ज्येष्ठमधाचा वापर करता येतो. ज्येष्ठमध, त्रिफळाचूर्ण, लोहभस्म, दूध आणि गाईचे तूप सर्व एकत्र करून प्यावे. त्यामुळे दृष्टी चांगली राहाते. तसंच यामुळे तुम्हाला कोणतेही नुकसान होत नाही. ज्येष्ठमध ही औषधी वनस्पती असल्याने तुमच्या शरीराला त्याचे अधिकाधिक फायदे मिळतात. ज्येष्ठमधाच्या काढ्याने डोळे धुतल्यास डोळ्याचे विकार दूर होण्यास मदत मिळते.

तापासाठी:-

ताप हा नेहमी येतो जातो. पण तुम्हाला जर डॉक्टरच्या औषधानेही गुण येत नसेल तर तुम्ही तापावर घरच्या घरी औषध म्हणून ज्येष्ठमधाचा वापर करू शकता. तापावर आयुर्वेदिक औषध हे नेहमीच गुणकारी ठरते. त्यातही ज्येष्ठमधाची पावडर, त्यात मनुका, मोहाचे फूल, वाळा, त्रिफळा हे सर्व मिक्स करून समप्रमाणात कुटून घ्या. रात्रभर गरम पाण्यात भिजवा आणि सकाळी हे पाणी प्या. यामुळे तुम्हाला त्वरीत गुण मिळेल

मासिक पाळीच्या त्रासात उपयोगी:-

मासिक पाळीचा त्रास हा प्रत्येक महिलेला होत असतो. त्यासाठी आपण बरेच इलाजही करत असतो. पण त्यामध्ये तुम्ही ज्येष्ठमधाचा वापर करून पाहा. तुम्ही ज्येष्ठमध पावडर, दूध, साखर, उडदाचे पीठ, मध हे सर्व एकत्र करून त्याचे सेवन करा. यामुळे मासिक पाळीचा त्रास सहन करण्यासाठी मदत मिळते. तसंच तुमचा त्रासही कमी होतो.

अतिसार:

कधीतरी हा त्रास होतोच. पण त्यावेळी घाबरून न जाता तुम्ही ज्येष्ठमधाचा उपयोग करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही ज्येष्ठमध, जायफळ, डाळिंबाच्या सालीची पावडर, खडीसाखर याचा काढा करून प्या. यामुळे तुम्हाला लगेच फरक जाणवले. जर तुम्हाला काढा करायचा नसेल तर तुम्ही ज्येष्ठमधाच्या चूर्णाचं तुपाबरोबर चाटण करूनही खाऊ शकता.

तुमच्या प्रायव्हेट पार्टजवळ आलेले रॅश दूर करण्यासाठी-

कधीतरी अति घाम अथवा सतत चालण्याने आपल्या शरीराच्या प्रायव्हेट पार्टजवळ रॅश येतात. हा भाग अतिशय नाजूक असतो. मग अशावेळी काय करायचं. घरगुती उपाय म्हणून तुम्ही ज्येष्ठमधाचा यासाठी वापर करू शकता. ज्येष्ठमध पावडर आणि शंखभस्म या दोन्हीचे मिश्रण करून तुम्ही ती पावडर त्या जागी लावा.

पण हे करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. कारण तुमची ही जागा अतिशय संवेदनशील असते आणि त्यामुळे कोणताही उपचार त्यावर करण्याआधी तुम्हाला योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

उलटी करताना रक्त येणे

कधीतरी उलटीचा त्रास होत असेल आणि उलटी करताना रक्त आले तर घाबरून जाऊ नका. कधीतरी तुम्हाला जेवणातून त्रासदायक पदार्थ पोटात गेल्याने असे होण्याची शक्यता असते. त्यावेळी तुम्ही ज्येष्ठमध पावडर आणि पांढरे चंदन हे दुधातून उगाळून त्याचे मिश्रण तयार करा आणि हे चाटण तुम्ही खाल्ल्यास तुमचा हा त्रास बंद होईल.

Health Info Team