अंबानींच्या मुलाने साईबाबांचे ‘दर्शन’ घेऊन केले इतक्या रु’पयांचे ‘दान’ की तो’डले सर्वांचे रेकॉर्ड, रक्कम ऐकून चकित व्हाल…

अंबानींच्या मुलाने साईबाबांचे ‘दर्शन’ घेऊन केले इतक्या रु’पयांचे ‘दान’ की तो’डले सर्वांचे रेकॉर्ड, रक्कम ऐकून चकित व्हाल…

अलीकडेच हुरून च्या देणगीदारांची यादी “EdelGive Hurun India Philanthropy List 2022” प्रसिद्ध झाली. या यादीत एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नादर हे आघाडीवर होते. या यादीत मुकेश अंबानी तिसऱ्या क्रमांकावर होते. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने आता मोठी रक्कम दान केली आहे. आणि पूर्वीचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट (SSST), शिर्डीला 1.5 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. अनंत २४ ऑक्टोबर रोजी साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात गेला होता. ट्रस्टच्या वतीने, श्री साई ट्रस्टने ही माहिती दिली.

“अनंत अंबानी यांनी ट्रस्टच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांना चेक दिला आहे. तो मंदिरात दर्शनासाठी आला होता.” अनंत अंबानी सुमारे तासभर मंदिरात थांबल्याचे ट्रस्टच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. दुपारची आरतीही केली. त्यांच्यासमवेत ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर अनंत यांनी सीईओंकडे धनादेश सुपूर्द केला.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट (SSST), शिर्डीचे प्रवक्ते पुढे म्हणाले की, देणगी दिलेली रक्कम ट्रस्टच्या कार्यासाठी वापरली जाईल. ही रक्कम साईबाबांच्या भक्तांसाठी वापरली जाणार आहे. प्रवक्त्याने असेही सांगितले की कोविड महामारीच्या काळातही अंबानी कुटुंबाने साई ट्रस्टला मदत केली होती.

त्यावेळी अंबानी यांनी ट्रस्टला ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी आणि आरटी-पीसीआर चाचणी प्रयोगशाळा तयार करण्यासाठी मदत केली. साईबाबा मंदिराजवळ बांधलेल्या रुग्णालयात ही सुविधा करण्यात आली होती.

ट्रस्टच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरूचे रहिवासी असलेले साईबाबांचे भक्त आर पंचपकेसन यांनी दिवाळीला मंदिराला फुलांनी सजवण्यासाठी देणगी दिली. दुसरीकडे, कानपूरच्या कविता कोतवानी कपूर आणि शनी शिंगणापूरचे गणेश साठे यांनी मंदिर परिसरात दिवाळीनिमित्त दिवे आणि झालर लावण्यासाठी देणगी दिली.

Health Info Team