बापरे : वयाच्या 28 व्या वर्षी तरुणी 9 मुलांची आई; 10 वर्षे राहिली प्रे’ग्नंट, कारण समजल्यावर लोकं झाले शॉक.

बापरे : वयाच्या 28 व्या वर्षी तरुणी 9 मुलांची आई; 10 वर्षे राहिली प्रे’ग्नंट, कारण समजल्यावर लोकं झाले शॉक.

कोणत्याही महिलेच्या आयुष्यात आई होण्यासारखं दुसरं सुख नाही. असं म्हणतात की, जेव्हा एखादी महिला आई होते तेव्हा तिचा नवा जन्म होतो. एका नवीन जीवाला जन्म देणे हे सर्वात मोठं पुण्य समजलं जातं. त्यामुळेच तर सुरुवातीच्या काळात एखाच जोडप्याला ८- १० लेकरं असायची.

एखाद्या महिलेला ८ ते १० मुलं असन हे आधीच्या काळात अगदी साधारण बाब समजली जात होती. मात्र आताच्या काळात असं ऐकिवात नाही. वाढती महागाई आणि लोकसंख्या यामुळे देखील जोडपे ३ ते ४ मुलं होऊ देतात. मात्र त्यानंतर नक्कीच कुटुंब नियोजनाचा विचार करतात.

कारण आजच्या काळात त्या मुलांना जन्म दिल्यानंतर त्याच्यासोबत येणाऱ्या जबाबदरी देखील खूप जास्त आहेत. असं असलं तरीही एका महिलेने 28 व्या वर्षी 9 मुलांना जन्म दिल्याची घटना चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे.

अमेरिकेतील लास वेगासमध्ये राहणाऱ्या एका महिलेने 28 व्या वर्षापर्यंत 9 मुलांना जन्म दिल्याचं समोर आलं आहे. सध्या ही महिला 39 वर्षाची असून तिचा पती आंद्रे ड्यूक 42 वर्षांचा आहे. या महिलेचं नाव कोरा असं आहे, आणि आजकाल सोशल मीडियावर ती जोरदार चर्चेत आली आहे.

यामध्ये सगळ्यात मुख्य बाब म्हणजे कोरा सतत 10 वर्षे गर्भवती होती आणि त्यामुळेच वयाच्या 28 व्या वर्षी तिने तब्ब्ल 9 मुलांना जन्म दिला आहे. आजच्या काळात जिथे मुले झाल्यानंतर महिलांना त्यांच्या फिगरची काळजी वाटते, इतकंच काय तर अनेकजणी त्यामुळे आई न होण्याचा निर्णय देखील घेतात.

तिथे 9 मुले असूनही कोराने तिची फिगर चांगली राखली आहे. कोरा अगदी फिट आहे. कोरा आपला बराच वेळ जिममध्ये घालवते. स्वतःला फिट ठेवण्यासाठी ती अनेक वेगवेगळ्या एक्सरसाईज करते आणि वजनही उचलते. आणि यामुळेच तिने एका तरुणीप्रमाणे तिचे फिगर राखली आहे.

अनेकजण तर तिला तिच्याच मुलांची मोठी बहीण समजतात. सन 2000 मध्ये, जेव्हा ती 16 वर्षांची होती, तेव्हा ती पहिल्यांदा गरोदर राहिली आणि 2001 मध्ये तिने तिची मोठी मुलगी एलिझाला जन्म दिला. त्यानंतर 2 वर्षांनी तिने दुसरी मुलगी शीनाला जन्म दिला.

2004 मध्ये तिने तिसर्‍या मुलीला जन्म दिला पण डॉक्टर तिचा जीव वाचवू शकले नाहीत. 2005 पासून तिची आई होण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि तिने जहाँ, कैरो, सैया अवी, रोमानी आणि तेहज यांना जन्म दिला. त्यांचा सर्वात लहान मुलगा सध्या 10 वर्षांचा आहे.

तिच्या शेवटच्या मुलाच्या जन्मानंतर, तिच्यावर ट्यूबल लिगेशनची शस्त्रक्रिया झाली, आणि त्यामुळे आता ती पुन्हा आई होऊ शकणार नाही. दरम्यान कोराला इन्स्टाग्रामवर 4 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. ती अनेकवेळा आपल्या कुटुंबाचे आणि आपले जिममधील फोटोज आणि व्हिडियोज शेअर करत असते. याचदरम्यान आपण सलग 10 वर्षे प्रेग्नंट असल्याच तीन सांगितलं होत. त्यावेळी अनेकांनी तिला ट्रोल केलं. मात्र आता तिचा फिटनेस बघून सर्वचजण आश्चर्य व्यक्त करतात.

Health Info Team