‘सिकंदर शेख’ माझ्यासोबत जे घडल ते चुकीचं…माझा संघर्ष सुरूच राहील…

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पै. महेंद्र गायकवाड तसेच श्री. सिकंदर शरीफसह उपांत्य फेरीच्या सामन्यात मारुती सातव हे पंच होते. हा सामना गमावल्यामुळे सिकंदर शेखला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. पंच मारुती सातव यांना धमकीचे फोन आल्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र सिकंदर शेख यांनी कोणतीही धमकी नसून एक प्रश्न असल्याचे सांगितले. माझ्यावर अन्याय झाल्याची पुस्ती सिकंदर शेख यांनी जोडली.
काही दिवसापुर्वी पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या सिकंदर शेख यांनी माध्यमांशी संवाद साधला. या स्पर्धेत विजेता मल्ल महेद्र गायकवाड याला नियम बाह्य गुण दिल्याच्या चर्चांना माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये ऊत आला आहे. आज उपमहाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. ते म्हणाले, “माझ्यासोबत जे काय झालं ते चुकीचं झालं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ उगाच झाला नाही. केवळ समोरचा कॅमेरा पाहून निर्णय घेण्यात आला मागील कॅमेराने तपासण्यात आला नाही. तसेच याचा जाब विचारायला गेलेल्य़ा माझ्या कोचला देखील तिथून हाकलून लावण्यात आलं. काय चुकीचं करताय…काय बरोबर करताय सर्वांना दिसत आहे.” अशी प्रतिक्रिया दिली.
पैलवान संग्राम कांबळे यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे पंच सातव यांना धमकी दिल्याचा आरोप केला जात आहे याबाबत विचारल्यावर ते म्हणाले, “संग्राम कांबळे यांनी कोणतीही धमकी दिली नाही. ती रेकॉर्डिंग मी ऐकलेली आहे. त्यामध्ये कोणतीही शिवीगाळ किंवा अपशब्द वापरला गेला नाही. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी कोणतीही गोष्ट तेथे घडलेली नाही. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा जाब प्रत्येक पैलवानाला विचारण्याचा हक्क आहे. आज हे विचारलं नाही तर पुढच्या काळातही हे असच चालत राहील” असेही ते म्हणाले.
शेवटी बोलताना ते म्हणाले, “माझ्यावर प्रेम करणारे सर्वजण मला फोन करून विचारतात. माझे हार हे माझे आई-वडील आणि कोच सहन करू शकले नाहीत ते अजून सुद्धा दुःखात आहेत. मी आतापर्यंत खूप वेळा हरलो आहे मात्र माझा संघर्ष सुरूच राहील.” अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
पुण्यातील मामासाहेब मोहोळ स्पोर्टस सिटी येथे यंदाच्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राज्यभरातील विविध पैलवानांनी सहभाग घेतला. कोथरूडचा प्रदेश या प्रदेशात लावण्यात आलेल्या फलक आणि स्वागत कमानी आणि इतर सजावटीमुळे कुस्ती खेळत आहे. या स्पर्धेत प्रमुख लढतींसह एकूण १८ वजनी गटात कुस्तीपटूंनी भाग घेतला. या आठवड्यात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. २०२२-२३ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात “महाराष्ट्र केसरी” विजेता कुस्तीपटू शिवराज राक्षे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानाची गदा देण्यात आली.